किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल६५ वर्षांवरील पुरुषांना तिसर्या मात्राची गरज,
नवी दिल्ली, ५ जुलै – कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांच्या नमुन्यांच्या केलेल्या अभ्यासात १६.१ टक्केनमुन्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट नियंत्रित करणारी रोगप्रतिकारकशक्ती आढळून आली नाही. याबाबतचा निष्कर्ष नव्या अभ्यासातून निघाल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात् आयसीएमआरने म्हटले आहे. या अभ्यासाची अजून समीक्षा झालेली नसल्याचे सांगण्यात येते.
वेल्लोर येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. टी. जॅकोब जॉन यांच्यानुसार, संबंधित नमुन्यात रोगप्रतिकारकशक्ती दिसून आली नाही, याचा अर्थ ती नाहीच असे, म्हणता येणार नाही. कदाचित या शक्तीची पातळी बरीच कमी असल्याने शोधली गेली नसेल. मात्र, ती तेथे असू शकेल आणि व्यक्तीचे विषाणूपासून संरक्षण करू शकेल. याशिवाय काही पेशी प्रतिकारशक्तीसाठी मध्यस्थ म्हणून काम करतील म्हणजे संसर्गापासून संरक्षणाचे काम होईल.
मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंडाची जुनाट दुखणी असलेल्या किंवा कर्करोगावर उपचार घेत असलेल्या ६५ वर्षांपुढील पुरुषांना (महिलांमध्ये रोगप्रतिकारकशक्तीची पातळी अधिक असते.) लसीची तिसरी मात्रा दिली गेली पाहिजे, असेही डॉ. जॉन यांनी सूचविले.
दरम्यान, भारतात काही लोकांना कोव्हिशिल्ड लसीची अतिरिक्त मात्रा (बुस्टर शॉट) लागू शकते. दुसरे म्हणजे, ज्यांना कोरोनाची बाधा झाली होती, अशांना पुरेशी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लसीची एक मात्राही पुरेशी आहे, असेही डॉ. जॉन यांनी सांगितले.