किमान तापमान : 29.34° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.29 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.62°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलडॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, ४ जुलै – देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. ऐक्याचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचा गौरव असावा. कलह नव्हे तर परस्पर संवाद हाच हिंदू-मुस्लिम संघर्षावर एकमेव तोडगा होय, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज रविवारी केले. मुस्लिम राष्ट्रीय मंचातर्फे ‘हिंदुस्थानी प्रथम, हिंदुस्थान प्रथम’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे तत्कालीन सल्लागार डॉ. ख्वाजा इफ्तिखार अहमद यांच्या ‘द मीटिंग ऑफ माईंड’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.
सरसंघचालक पुढे म्हणाले, सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदू-मुस्लिम वेगळे नाही तर एकच आहेत. लोकांच्या उपासना पद्धतीबाबत भेदभाव करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
देशाला शक्तिशाली करण्यासाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी रा. स्व. संघ कार्य करीत आहे, असे ते म्हणाले. एखादी व्यक्ती विशिष्ट धर्माची आहे म्हणून तिच्यावर हल्ला चढवणे, झुंडबळी हे प्रकार हिंदुविरोधी आहेत. जे लोक धर्माच्या नावाखाली झुंडबळीसारखे प्रकार करतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही डॉ. मोहनजी भागवत म्हणाले. आम्ही लोकशाहीवादी देशात राहातो. येथे हिंदूंचे किंवा मुस्लिमांचे वर्चस्व असू शकत नाही. तेथे फक्त भारतीयांचे वर्चस्व असू शकते, असेही सरसंघचालक म्हणाले. स्वतःला हिंदू नाही तर भारतीय म्हणा. राजकारण लोकांना एकत्र करू शकत नाही. परंतु, ते ऐक्य बिघडवण्याचे माध्यम बनू शकते. राष्ट्राचे हित हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.