किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलममतांना खुश करण्यासाठी सोनिया गांधी घेणार निर्णय,
नवी दिल्ली, ४ जुलै – देशातील आगामी राजकारणाचा विचार करून तृणमूल कॉंग्रेसशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असलेल्या कॉंगे्रसच्या अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना खुश करण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अधीररंजन चौधरी यांच्याकडून लोकसभेतील गटनेतेपद काढण्यात येणार असल्याची माहिती आहे.
एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले आहे. चौधरींना हटवून नव्या नेत्याकडे हे पद सोपविले जाऊ शकते. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे यात म्हटले आहे.
अधीररंजन चौधरी हे बंगालमधील बहरामपूरचे खासदार आहेत. ते बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्य चेहरा होते. जी-२३ या गटावर टीका करण्यात त्यांनी कुठलीच कसर ठेवली नव्हती. पक्ष संघटनेत बदल करण्याची मागणी या गटाने मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधी यांना पत्र लिहून केली होती, त्यावेळी चौधरी यांनी या गटावर सर्वप्रथम टीका केली होती.
भाजपाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चौधरींना पदावरून दूर केले जाऊ शकते. चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांशी युती करून ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. ते ममता आणि त्यांच्या सरकारचे विरोधक आहेत. निवडणुकीच्या काळात कॉंग्रेसच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांनी ममतांवर टीका करणे टाळले होते. आता चौधरींना हटवून संसदेतही तृणमूलशी हातमिळवणी करण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे, असे सूत्रांचे मत आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते होण्याच्या शर्यतीत खासदार शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचे नाव आघाडीवर आहे. हे दोघेही सोनिया गांधी यांना पत्र लिहिणार्या जी-२३ गटाचे सदस्य आहेत, हे विशेष.