किमान तापमान : 29.24° से.
कमाल तापमान : 29.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.74° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश,
नवी दिल्ली, ४ जुलै – भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या खरेदीवरून ब्राझीलचे राजकारण चांगलेच तापले आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने भारत बायोटेकसोबत झालेला दोन कोटी लस खरेदीचा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या कराराची चौकशी ९० दिवसांच्या आत करावी आणि आपल्याला अहवाल सादर करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये ब्राझील सरकारने हैदराबाद मधील लस निर्मिती कंपनी असलेल्या भारत बायोटेकशी करार करून दोन कोटी लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. या कराराची एकूण रक्कम ही २४०० कोटी रुपये होती. या करारात मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांवर केला होता. त्यानंतर हा करार रद्द करण्यात आला आहे.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांनी कोव्हॅक्सिनची लस ज्यादा किमतीत खरेदी केली असून, या करारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. जगभरातील लसी या कमी किमतीत उपलब्ध असतानाही राष्ट्राध्यक्षांनी जास्त किमतीच्या कोव्हॅक्सिनला प्राधान्य दिल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणी लुई मिरांडा यांनी संसदीय समितीकडे तक्रार केली होती.
चौकशीसाठी ९० दिवसांची मुदत
कोव्हॅक्सिन कराराचे नेमके स्वरूप काय आहे, यामध्ये काही अनियमितता आहेत का किंवा यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, हे तपासण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अधिकार्यांना ९० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये कोव्हॅक्सिन कराराची चौकशी करावी, संबंधित पुरावे तपासावेत आणि आपल्याला अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हा करार रद्द झाल्यामुळे कोरोना लस निर्मिती करणारी स्वदेशी कंपनी भारत बायोटेकला मोठा धक्का बसला आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या शिफारशींवरून कोव्हॅक्सिन खरेदी करण्याचा करार रद्द करण्यात आला आहे, असे ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या करारात ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकामेंटोस ही कंपनीही भागीदार आहे. या करारावरून ब्राझीलचे राजकारण चांगलेच तापले आहे.