किमान तापमान : 28.31° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.38°से. - 33.99°से.
गुरुवार, 05 डिसेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 28.9°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर छितरे हुए बादल26.74°से. - 28.42°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल26.23°से. - 27.78°से.
रविवार, 08 डिसेंबर टूटे हुए बादल24.61°से. - 25.97°से.
सोमवार, 09 डिसेंबर टूटे हुए बादल23.16°से. - 25.8°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) भरती व शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चार जणांंविरुद्ध पूरक आरोपपत्र दाखल केले, अशी माहिती एका अधिकार्याने शनिवारी दिली.
अमृतपालसिंग ऊर्फ अॅमी आणि अमरीकसिंग (दोघेही फिलिपाईन्समधून हद्दपार) आणि जस्सासिंग आणि गगनदीपसिंग ऊर्फ मिथी यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले.
यापूर्वी तपास संस्थेने २२ जुलै रोजी या प्रकरणात नऊ आरोपी लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. दहशतवादी संघटना केटीएफच्या १२ अन्य सदस्य आणि बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) व केटीएफशी संबंधित त्याच्या सहकार्यांची भूमिका व सहभाग याचाही या प्रकरणात तपास सुरू आहे, असे प्रवक्त्याने सांगितले. कॅनडात राहणारा एक सूचीबद्ध दहशतवादी अर्शदीपसिंग ऊर्फ अर्श डलाने आरोपी मनप्रीतसिंग ऊर्फ पिटासह अमृतपाल, अमरीक, जस्सा आणि गगनदीपला आपल्या दहशतवादी गटात सामील केले होते, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. फिलिपाईन्समध्ये काम करणारा अमृतपाल आणि अमरीकसिंग तरुणांच्या भरतीमध्ये सक्रियपणे गुंतले होते, असेही अधिकार्यांनी सांगितले.