किमान तापमान : 28.69° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 54 %
वायू वेग : 5.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.71°से. - 30.86°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.1°से. - 30.33°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.21°से. - 29.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल25.68°से. - 29.57°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.75°से. - 29.65°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.8°से. - 29.22°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१४ मार्च) – अदानी-हिंडेनबर्ग वाद, वाढती महागाई आणि राहुल गांधी यांचे लंडनमधील वक्तव्य, यावरून संसदेत सतत गोंधळ सुरू आहे. खासदारांनी केलेल्या गदारोळामुळे पहिल्या दिवसाचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक खासदारांनी आज मंगळवारी अदानी एपिसोडवर चर्चेसाठी नोटीस दिली. नोटीसमध्ये संजय सिंह यांनी अदानी कोळसा खाणीच्या वाटपामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि अदानी समूहावरील फसवणुकीच्या आरोपांवर चर्चेची मागणी केली. गदारोळानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.
लोकसभेत पुन्हा एकदा प्रचंड गदारोळ झाला. भाजप खासदार राहुल गांधी माफी मागण्यावर ठाम आहेत. राज्यसभेतील गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करत म्हटले की, परदेशात जाऊन देशाची बदनामी केली जात आहे. हे अत्यंत लज्जास्पद आहे. परदेशी भूमीवर भारताचा अपमान झाला. सोबतच सभागृहाचाही अवमान करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ’राहुल सांगतात की, सभागृहात त्यांचा माईक बंद करण्यात आला होता आणि त्यांनी बाहेरील देशांना भारताच्या कारभारात हस्तक्षेप करण्यास सांगितले, त्यामुळे राहुल गांधींनी माफी मागावी, अशी आमची इच्छा आहे.’
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, ’देशात हुकूमशाही कोणी केली, त्यांच्या पक्षात कोणती हुकूमशाही सुरू आहे आणि खर्गेजींना कशी वागणूक दिली जाते, हे सर्वांना माहीत आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या ड्रामा कंपनीला वाटते की, ते देशावर राज्य करण्यासाठी जन्माला आले आहेत, यावरून त्यांची हुकूमशाही दिसून येते. लोकसभेचे कामकाज सुरू होताच गदारोळ झाला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगिती करण्यात आले होते. दरम्यान, राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाले आहे. यावेळी सभागृहात राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.