किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 29.49° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.49° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलनागपूर, (१४ मार्च) – जागतिक कल्याणाच्या उदात्त ध्येयाला आकार देण्यासाठी भारताचा ‘स्व’चा दीर्घ प्रवास हा आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे, असे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मत व्यक्त करण्यात आले आहे. सेवा साधना एवं ग्राम विकास केंद्र, पट्टीकल्याणा, समालखा, पानिपत (हरियाणा) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानिमित्त पत्रकार वार्तेच्या माध्यमातून सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी बैठकीच्या माध्यमातून पुढील वर्षभरासाठी संघाच्या कार्यपद्धतीची रूपरेषा आणि संघ कार्याचे इतिवृत्त प्रस्तुत केले. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते. वरिष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांच्या निधनावर शोक व्यक्त करून पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यात आली.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे म्हणाले की, जागतिक कल्याणाच्या उदात्त ध्येयाला आकार देण्यासाठी भारताचा ‘स्व’चा दीर्घ प्रवास हा आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे, असे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मत व्यक्त करण्यात आले. परकीय आक्रमणे आणि संघर्षांच्या काळात भारतीय जनजीवन विस्कळीत झाले आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्थांना गंभीर दुखापत झाली. या काळात आदरणीय संत-महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अविरत संघर्ष करून संपूर्ण समाजाने ‘स्व’ सुरक्षित ठेवला. या संघर्षाची प्रेरणा स्वधर्म, स्वदेशी आणि स्वराज्य या ’स्व’ त्रयीमध्ये होती, ज्यामध्ये संपूर्ण समाज सहभागी झाला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देश या लढ्यात योगदान देणार्या लोकनेते, स्वातंत्र्यसैनिक आणि ऋषीमुनींचे कृतज्ञतेने स्मरण करतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.