किमान तापमान : 29.02° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.02° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलबंगळुरू, १५ डिसेंबर – हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना, आज बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये मागील आठवड्यात भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वरुणसिंह बचावले होते. भारतीय वायुदलातील विंग कमांडर वरुणसिंह यांना शौर्यचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. भारतीय वायुदलासाठी केलेल्या सेवेसाठी त्यांचा हा सन्मान करण्यात आला. तेजस विमानाची फ्लाईट सिस्टिम निकामी झाली असताना त्यांनी यशस्वीरीत्या विमान धावपट्टीवर उतरवून दुर्घटना होण्यापासून रोखले होते. लष्कराच्या बड्या अधिकार्यांना घेऊन वायुदलाचे हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि भारतीय सैन्य दलातील बडे अधिकारी होते. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रुप कॅप्टन वरुणसिंह यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेली सेवा देश कधीच विसरणार नाही. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रती संवेदना व्यक्त करतो, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=46817