किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलचेन्नई, (१७ ऑक्टोबर) – इस्रोचे अध्यक्ष श्रीधर सोमनाथ यांनी भारतीय बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदची त्यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी भेट घेतली. प्रत्येक भारतीयाप्रमाणेच आम्हालाही प्रज्ञानंदच्या कामगिरीबद्दल खूप अभिमान आहे. तो आता जागतिक क‘मवारीत १५ व्या क्रमांकावर आहे आणि लवकरच तो जगातील नंबर १ बनेल. आपण चंद्रावर जे केले, ते त्याने पृथ्वीवर करून दाखविले, असे गौरवोद्गार सोमनाथ यांनी काढले.
सोमनाथ म्हणाले की, बुद्धिबळ हा जुना खेळ भारतात सुरू झाला आणि त्याचे मूळ इथेच आहे. हा मेंदू आणि प्रतिभांचा, नियोजन आणि रणनीतीचा खेळ आहे आणि त्यामुळेच भारत त्यात पुढे आहे. आम्हाला अभिमान आहे की, चंद्रासोबत जमिनीवरही बुद्धिमत्ता आहे. भारतीय बुद्धिबळ ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंद आता इस्रोसोबत काम करणार आहे. आम्ही चंद्रावर भारतासाठी जे काही केले, ते पृथ्वीवर प्रज्ञानंदने पूर्ण केले आणि आता तो आमच्यासोबत अवकाश संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठीही काम करणार आहे.
सोमनाथ यांना ट्रॉफी भेट
या भेटीत. सोमनाथ यांनी प्रज्ञानंदला जीएसएलव्ही रॉकेटची प्रतिकृती प्रेरक भेट म्हणून दिली व आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. प्रज्ञानंदनेही सोमनाथ यांना त्याच्या ट्रॉफी भेट देऊन शास्त्रज्ञ आणि आगामी गगनयान मोहिमेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या.