किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१७ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताच्या गगनयान मिशनच्या तयारीसंदर्भात आढावा बैठक झाली. क्रू एस्केप सिस्टम टेस्ट व्हेईकलचे पहिले प्रात्यक्षिक उड्डाण २१ ऑक्टोबर रोजी नियोजित करण्यात आले आहे आणि ते २०२५ मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांना चंद्रावर पहिले भारतीय पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
काय झालं बैठकीत
गगनयान मोहिमेच्या तयारीसंदर्भात पंतप्रधानांनी बोलावलेल्या आढावा बैठकीत अंतराळ विभागाने या मोहिमेचा सर्वसमावेशक आढावा सादर केला. या विहंगावलोकनामध्ये आतापर्यंत विकसित केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा समावेश आहे, जसे की मानवी-रेटेड लाँच व्हेईकल (एचएलवीएम ३) आणि सिस्टम पात्रता. मानवी रेटेड लॉन्च व्हेईकलच्या अनक्रियूड मिशनसह सुमारे २० मोठ्या चाचण्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. या बैठकीत २०२५ मध्ये हे अभियान सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
चांद्रयान-३ आणि आदित्य एल१ मोहिमांसह भारताच्या अंतराळ उपक्रमांच्या अलीकडच्या यशाच्या आधारे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय आता आपण अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे ठेवली पाहिजेत असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आपल्याला २०४० पर्यंत चंद्रावर पहिले भारतीय पाठवायचे आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी अंतराळ विभाग चंद्राचा शोध घेण्यासाठी रोडमॅप तयार करणार आहे.