किमान तापमान : 27.9° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 3.4 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.78°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चित्रकूट परिसरातील तुलसी पीठ या स्थानाला भेट दिली. त्यांनी तेथील कांच मंदिरात पूजा करून दर्शन घेतले. तुलसी पीठ येथील जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे आशीर्वाद घेऊन पंतप्रधानांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात त्यांनी ‘अष्टाध्यायी भाष्य’, ‘रामानंदाचार्य चरितम्’ आणि ‘भगवान श्री कृष्ण की राष्ट्रलीला’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन केले.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, विविध मंदिरांमध्ये श्री रामाचे दर्शन घेऊन पूजा केल्याबद्दल आणि विविध संतांचे, विशेषतः जगद्गुरू रामानंदाचार्य यांचे आशीर्वाद मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘अष्टाध्यायी भाष्य’, ‘रामानंदाचार्य चरितम्’ आणि ‘भगवान श्री कृष्ण की राष्ट्रलीला’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि ते म्हणाले की, या पुस्तकांमुळे भारताची ज्ञान परंपरा अधिक मजबूत होईल. ही तीन पुस्तके म्हणजे जगदगुरुंनी मला दिलेला आशीर्वाद आहे,ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले, अष्टाध्यायी म्हणजे भारताचे भाषाशास्त्र, भारतातील विद्वत्ता आणि आपल्या संशोधनात्मक संस्कृतीचे वर्णन करणारा हजारो वर्ष प्राचीन ग्रंथ आहे. त्यांनी अर्थगर्भ सूत्र स्वरुपात भाषेचे व्याकरण आणि विज्ञान सामावणार्या अष्टाध्यायींच्या प्रतिभेवर अधिक प्रकाश टाकला. ते म्हणाले की अनेक भाषा आल्या आणि लोप पावल्या पण संस्कृत भाषा मात्र शाश्वत राहिली. काळाने संस्कृत भाषेला अधिकाधिक शुद्ध केले मात्र ती प्रदूषित होऊ शकली नाही, ती कायमच चिरंतन राहिली, पंतप्रधान म्हणाले. संस्कृत भाषेच्या स्थायीभावाच्या मुळाशी या भाषेचे सामर्थ्यशाली व्याकरण आहे असे त्यांनी सांगितले. केवळ १४ महेश्वर सूत्रांवर आधारलेली ही भाषा शास्त्र आणि सहस्त्र यांची जन्मदात्री मानली जाते. भारतातील कोणतेही राष्ट्रीय आयाम लक्षात घेतले तरी तुम्हांला त्यात संस्कृत भाषेचे योगदान दिसून येईल, पंतप्रधान मोदी म्हणाले.
हजार वर्षांपूर्वीच्या गुलामगिरीच्या काळात भारताची संस्कृती आणि वारसा समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत मोदींनी संस्कृत भाषा दुरावल्याचा उल्लेख केला. काही विशिष्ट व्यक्तींनी पुढे नेलेल्या गुलामगिरीच्या मानसिकतेमुळे संस्कृतविषयी शत्रुत्वाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मातृभाषा आत्मसात करणे हे परदेशात प्रशंसनीय असले तरी भारताला ते लागू नसण्याच्या मानसिकतेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी खंत व्यक्त केली. देशातील भाषा समृद्ध करण्याच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले कि संस्कृत ही केवळ परंपरेची भाषा नाही, तर ती आपल्या प्रगतीची आणि अस्मितेचीही भाषा आहे. आधुनिक काळात यशस्वी प्रयत्नांसाठी अष्टाध्यायी भाष्य सारखे धर्मग्रंथ महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी जगद्गुरू रामानंदाचार्य यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आणि त्यांच्या विद्वत्तेचा आणि योगदानाचा उल्लेख केला. हा विद्वत्तेचा स्तर कधीही वैयक्तिक नसतो, तर ही विद्वत्ता राष्ट्रीय खजिना आहे, पंतप्रधान म्हणाले. २०१५ मध्ये स्वामीजींना पद्म विभूषण प्राप्त झाले.स्वामीजींच्या राष्ट्रीय आणि सामाजिक पैलूंचा उल्लेख करून पंतप्रधानांनी स्वच्छ भारतातील नऊ प्रमुख सदिच्छादूतांपैकी एक म्हणून त्यांच्या सक्रिय योगदानाचे स्मरण केले.
स्वच्छता, आरोग्य आणि स्वच्छ गंगा ही राष्ट्रीय उद्दिष्टे आता साकार होत असल्याबद्दल मोदींनी संतोष व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, प्रत्येक देशवासीयाचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्यात जगद्गुरू रामभद्राचार्यजींनी मोठी भूमिका बजावली आहे. अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मिळालेल्या निमंत्रणाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले कि ज्या राम मंदिरासाठी तुम्ही न्यायालयात आणि न्यायालयाबाहेर खूप योगदान दिले आहे, तेही तयार होणार आहे.
अमृतकाळात देश विकास आणि वारसा सोबत घेऊन जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तीर्थक्षेत्रांच्या विकासावर भर देताना मोदी म्हणाले कि चित्रकूटमध्ये आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच नैसर्गिक सौंदर्य देखील आहे. त्यांनी केन-बेतवा जोड प्रकल्प, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग आणि संरक्षण कॉरिडॉरचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की या प्रदेशात नवीन संधी निर्माण होतील. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी चित्रकूट विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास व्यक्त केला आणि जगद्गुरू रामानंदाचार्य यांच्यापुढे ते नतमस्तक झाले. तुलसीपीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे यावेळी उपस्थित होते.