किमान तापमान : 27.64° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस २०२३ संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन २७ ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी२०२३ च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘५जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली. पंतप्रधानांनी दालन क्र.५ मधील प्रदर्शनाचे उद्घाटन देखील केले आणि प्रदर्शनाची पाहणी केली.
या कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी देखील त्यांचे विचार मांडले. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीचे अध्यक्ष आकाश एम.अंबानी यांनी युवा पिढीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सवय रुजवून त्यांचे जीवन सुधारणे आणि त्यायोगे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील डिजिटल पायाभूत सुविधांना अधिक सामर्थ्य प्रदान करणे यासंदर्भातील पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा केली. डिजिटल इंडिया कार्यक्रमाला अधिक समावेशक, अभिनव आणि शाश्वत स्वरूप देण्यात देशातील लाखो युवकांसाठी पंतप्रधान मोठे प्रेरणास्थान आहेत यावर त्यांनी बोलताना अधिक भर दिला. जिओ कंपनीने भारताच्या सर्व २२ परिमंडळांमध्ये एकंदर १० लाख ५ जी सेल्स उभारली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. यातून एकूण ५ जी वितरणाच्या ८५ टक्के भागाचे योगदान कंपनी देत असून या ५ जी एककांची रचना, विकसन आणि उत्पादन भारतीय प्रतिभावंतांनी केले आहे. देशभरातील सव्वाशे दशलक्ष वापरकर्त्यांसह भारताचा समावेश जगभरातील पहिल्या तीन प्रमुख ५ जी तंत्रज्ञानाने सुसज्ज देशांमध्ये झाला आहे अशी माहिती आकाश अंबानी यांनी दिली.पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भारताला एकत्र आणल्याची बाब अधोरेखित करत त्यांनी उदाहरणादाखल वस्तू आणि सेवा कर, भारतातील डिजिटल क्रांती आणि जगातील सर्वात उंच पुतळ्याची देशात उभारणी या बाबींचा उल्लेख केला. तुमचे प्रयत्न आम्हां सर्वांना या भारत मोबाईल काँग्रेसमध्ये प्रेरणा देत आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशातील सर्व डिजिटल उद्योजक, अभिनव संशोधक तसेच स्टार्ट अप उद्योग यांच्या वतीने अंबानी यांनी देशाच्या अमृतकाळात भारताचे स्वप्न साकार करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.
पंतप्रधान मोदी यांनी डिजिटल भारताच्या रुपात मांडलेल्या आणि ज्यामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधा वाढत्या वेगाने विकसित झाल्या त्या संकल्पनेचे भारती एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी पुन्हा स्मरण केले. पंतप्रधानांच्या जेएएम त्रिसूत्रीसंकल्पनेमुळे झालेले परिवर्तन तसेच भारतातील डिजिटल परिवर्तनाची जगणे घेतलेली नोंद या बाबी त्यांनी यावेळी अधोरेखित केल्या. ते म्हणाले की भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा (डीपीआय) जगातील अनेक देशांना हेवा वाटण्याचा विषय आहे. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे आणखी एक सशक्त उदाहरण म्हणजे मेक इन इंडिया उपक्रम असे सांगून मित्तल म्हणाले की, गेल्या एका वर्षातच उत्पादन क्षेत्राने कित्येक भरार्या घेतल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात भारताची मुळे खोलवर रुजलेली आहेत. अॅपल ते डिक्सॉन, सॅमसंग ते टाटा अशा सर्व लहान मोठ्या कंपन्या आणि स्टार्ट अप उद्योग देशातील निर्मिती क्षेत्रात सहभागी आहेत आणि त्यामुळे भारत हा एक उत्पादक देश म्हणून उदयाला आला आहे. विशेषतः, मोठ्या प्रमाणातील डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्राच्या बाबतीत तर भारत जागतिक स्तरावरील आघाडीचा देश झाला आहे असे ते म्हणाले. देशभरातील ५००० लहान शहरे आणि २०,००० गावांमध्ये एअरटेलच्या ५ जी सेवेचा विस्तार यापूर्वीच झाला आहे आणि येत्या मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशभरात या सेवेचा विस्तार होईल अशी माहिती देऊन मित्तल यांनी यासंदर्भात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाचा देखील उल्लेख केला. हा जगभरातील सर्वात वेगवान ५ जी सेवा विस्तार असेल असे ते म्हणाले.
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी भारताच्या डिजिटल परिवर्तनामध्ये केलेल्या दृष्ट्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि सर्वांना लाभदायक ठरणार्या ‘अंत्योदय’ या तत्वावर आधारित डिजिटल समावेशनाप्रती पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची प्रशंसा देखील केली. डिजिटल उत्क्रांतीमध्ये भारताने केलेल्या विकासासाठी त्यांनी या दृष्टीकोनाला श्रेय दिले आणि याला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे असे सांगितले. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून प्रेरणा घेऊन भारत ग्लोबल साउथ कडील विजेता ठरला आहे, बिर्ला म्हणाले. ओळख निश्चिती, पैशांचे व्यवहार आणि माहितीचे व्यवस्थापन यांच्या संदर्भातील भारताच्या पथदर्शी सार्वजनिक पायाभूत सुविधांचा स्वीकार करण्यास अनेक देश उत्सुक आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या कामात व्होडाफोन आयडिया कंपनी एक जबाबदार भागीदाराची भूमिका बजावण्यास कटिबद्ध आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ६ जी सारख्या क्षेत्रांमध्ये भविष्यवादी तंत्रज्ञानाचे मापदंड विकसित करण्यात भारत सक्रियतेने सहभागी आहे याचा उल्लेख त्यांनी केला. सरकारने उद्योजकांना देऊ केलेल्या पाठबळाबद्दल बिर्ला यांनी सरकारचे आभार मानले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, २१ व्या शतकातील बदलत्या काळात, कोट्यवधी लोकांची आयुष्ये बदलून टाकण्याचे सामर्थ्य अशा कार्यक्रमात आहे. तंत्रज्ञानाची जलदगती अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले, येथेच आणि हाच भविष्यकाळ आहे. या संमेलनात दूरसंचार, तंत्रज्ञान आणि संपर्क या क्षेत्रातील भविष्यकाळाची झलक दाखवणारे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते त्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ६ जी, कृत्रिम बुद्धीमत्ता, सायबर सुरक्षा, सेमीकंडक्टर्स, ड्रोन आणि अवकाश क्षेत्र, खोल समुद्र, हरित तंत्रज्ञान तसेच इतर अनेक क्षेत्रांचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, भविष्यकाळ हा एकदमच वेगळा असणार आहे आणि आपली तरुण पिढी तंत्रज्ञानविषयक क्रांतीचे नेतृत्व करत आहे हे पाहणे अत्यंत आनंदाचे आहे.
गेल्या वर्षी भारतात सुरु करण्यात आलेल्या आणि उर्वरित जगासाठी एक आश्चर्य ठरलेल्या ५ जी सेवेचे स्मरण पंतप्रधान मोदी यांनी केले. ५ जी च्या यशानंतर भारत थांबला नाही तर हे तंत्रज्ञान देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने काम केले यावर पंतप्रधानांनी भर दिला. भारताने ५ जी तंत्रज्ञानाची सुरुवात ते या तंत्रज्ञानाचा सर्वत्र प्रसार असा प्रवास केला आहे,ते म्हणाले. ५ जी सेवेची सुरुवात झाल्यापासून एका वर्षातच देशात ४ लाख ५जी बेस स्टेशन्स विकसित करण्यात आली, यात ९७ टक्क्याहून अधिक शहरे आणि ८०% लोकसंख्येपर्यंत ही सेवा पोहोचवण्यात आली. एका वर्षभरात मिडीयन मोबाईल ब्रॉडबँड सेवेचा वेग तिपटीने वाढला ही बाब त्यांनी अधोरेखित केली. पंतप्रधान पुढे म्हणाले की, ब्रॉडबँड सेवेच्या वेगाच्या बाबतीत भारताने ११८व्या स्थानावरून आता ४३व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारत केवळ ५जी नेटवर्कचा देशभरात विस्तार करत नसून ६जी च्या बाबतीत आघाडीवर राहण्यावर देखील अधिक भर देत आहे, ते म्हणाले. २ जी सेवेच्या काळात झालेल्या घोटाळ्याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात सुरु झालेल्या ४ जी सेवेदरम्यान अशी कोणतीही घटना घडलेली नाही. ६ जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत आघाडीवर राहील असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला.
केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष आकाश एम अंबानी, भारती एंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.