किमान तापमान : 28.14° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.84°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल– गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन,
हैदराबाद, (२७ ऑक्टोबर) – आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याची जागा घेणारी तीन नवीन विधेयके लवकरच संसदेत मंजूर केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक‘वारी केले.
येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीमध्ये आयपीएस प्रोबेशनर्सच्या ७५ व्या तुकडीच्या पासिंग आऊट परेडमध्ये अमित शाह म्हणाले की, आता दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण आणि शून्य सहिष्णुता कृतीच्या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे. भारत ब्रिटिश राजवटीतील कायदे रद्द करीत आहे आणि नवीन आत्मविश्वास आणि नवीन आशेने एका नव्या युगात प्रवेश करीत आहे. गृह व्यवहारांबाबतची संसदीय स्थायी समिती तीन नवीन विधेयकांची तपासणी करीत असून, ती लवकरच मंजूर केली जातील. नवीन कायदे लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहेत.
विशेष म्हणजे, ही तिन्ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती. गृहमंत्री शाह यांनी ही विधेयके सर्वसमावेशक सल्लामसलत आणि चर्चेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस केली होती. ऑगस्ट महिन्यातील तीन विधेयकांचा अभ्यास करण्यासाठी समितीला तीन महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. नवीन कायद्यांमध्ये दहशतवाद, संघटित गुन्हेगारी यावरील नवीन व्या‘यांचा समावेश आहे आणि आंतरराष्ट्रीय टोळ्या संपविण्यासाठी अनेक नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत.