किमान तापमान : 28.15° से.
कमाल तापमान : 28.71° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.98 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.71° से.
27.47°से. - 31.2°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल26.75°से. - 30.84°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 30.31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.46°से. - 30.28°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.42°से. - 29.88°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.64°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल– निवडणूक आयोगाने बजावली नोटीस,
नवी दिल्ली, (२७ ऑक्टोबर) – निवडणूक आयोगाने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वढेरा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ३० ऑक्टोबरच्या सायंकाळपर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. राजस्थानमधील निवडणूक प्रचारादरम्यान प्रियांका यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपाने केल्यावर आयोगाने ही नोटीस पाठवली. खोटे दावे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धेवर भाष्य केल्याचा आरोप भाजपाने प्रियांका यांच्यावर केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भाजपा नेत्यांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे पोहोचले. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, अर्जुन राम मेघवाल, अनिल बलूनी आणि ओम पाठक यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. लेखी तक्रारीसोबतच त्यांनी प्रियांकांचा व्हिडीओही दिला आणि प्रियांका यांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. प्रियांका यांनी धार्मिक भावना दुखावत असल्याचा आरोपही भाजपाने केला होता. मेघवाल म्हणाले की, २० ऑक्टोबर रोजी प्रियांका वढेरा यांनी त्यांच्या भाषणादरम्यान विधान केले आणि आचारसंहितेचे उल्लंघन केले. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
प्रियांका यांनी देवनारायण मंदिराच्या दानपेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकलेल्या लिफाफ्यावर भाष्य केले होते. प्रियांका म्हणाल्या होत्या की, खरे आहे की नाही हे मला माहिती नाही, परंतु मोदी देवनारायणजींच्या मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी एक पैशाचं पाकिट दान म्हणून दिले. सहा महिन्यांनंतर जेव्हा पंतप्रधान मोदींनी दान केलेला लिफाफा उघडला गेला, तेव्हा त्यात २१ रुपये सापडले. देशात व्यासपीठावर उभे राहून कशा कशा प्रकारचे लिफाफे आपल्याला दाखवले जात आहेत. जेव्हा आपण ते लिफाफे उघडतो तेव्हा निवडणूक संपलेली असते.