किमान तापमान : 27.31° से.
कमाल तापमान : 27.95° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 3.77 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.31° से.
26.99°से. - 30.4°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.67°से. - 31.27°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.13°से. - 31.45°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 30.35°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.72°से. - 30.45°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिेल्ली, (२६ ऑक्टोबर) – जगातील सर्वाधिक प्रदूषित १० देशांमध्ये भारताचा समावेश झाला असून, भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये मुंबई पहिल्या आणि जगात दुसर्या क्रमांकावर आहे. हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणार्या आयक्यूएअर या स्वीडिश कंपनीने मोजलेल्या १०९ शहरांपैकी मुंबई दुसर्या तर, दिल्ली सहाव्या क‘मांकावर आहे.
सर्वाधिक प्रदूषित हवा चीनची राजधानी बीजिंगमध्ये होती, जी १०९ देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकात भारताचा समावेश पहिल्या १० देशांमध्ये झाला आहे. हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणार्या आयक्यूएअर या स्वीडिश कंपनीने मोजलेल्या १०९ शहरांपैकी मुंबई जगभरातील शहरांमध्ये दुसर्या क‘मांकावर आहे. दिल्लीत सध्या मुंबईच्या तुलनेत कमी वायू प्रदूषण असल्याचे दिसून आले आहे. एअर क्वालिटी इंडेक्स स्कोअर मोजण्याचे एकके अमेरिकन प्रणालीवर आधारित आहेत. जेथे ०-५० सर्वोत्तम मानले जाते आणि ३०० पेक्षा जास्त धोकादायक मानले जातात. ५१-१०० मधील स्कोअर मध्यम आहेत, १०१-१५० मधील स्कोअर लहान मुलांसाठी आणि संवेदनशील गटांसाठी अस्वास्थ्यकर आहेत, १५०-२०० मधले स्कोअर हे अस्वास्थ्यकर आहेत, २०१ ते ३०० खूप अस्वस्थ आहेत. मुंबईचा स्कोअर १६० आहे.
भारताच्या जीडीपीवरही परिणाम
भारतातील मुंबई आणि दिल्ली व्यतिरिक्त अहमदाबाद या शहराचाही या यादीत समावेश आहे. २०१९ मध्ये प्रदूषणामुळे होणार्या मृत्युंमुळे भारताला अंदाजे २८.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताच्या जीडीपीवरही परिणाम झाला. अशा परिस्थितीत भारत सरकार वायू प्रदूषणाबाबत काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पाटणा आणि चेन्नई इत्यादी शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट झाली होती, यावेळीही तीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.