किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकोरोना काळातील मदतकार्यात ५.६० लाख स्वयंसेवकांचा सहभाग, निधी समर्पण अभियानात ५.४५ लाख स्थानांवर संपर्क, १२.४७ कोटी परिवारांशी साधला थेट संवाद,
बंगळुरू, १९ मार्च – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसाठी निधी समर्पण अभियानाचा हेतू जास्तीत जास्त निधी गोळा करणे, हा नव्हता. देशभरातील जास्तीत जास्त गाव, परिवारांपर्यंत पोहोचणे, हेच एकमात्र उद्दिष्ट होते. यापूर्वी इतके व्यापक जनसंपर्क अभियान कधीच झाले नाही. या अभियानांतर्गत २० लाख स्वयंसेवकांनी ५ लक्ष ४५ हजार ७३७ स्थानांपर्यंत पोहोचून १२ कोटी ४७ लाख २१ हजार परिवारांशी संपर्क साधला. यामुळे संपूर्ण देशात भावनात्मक एकात्मतेची अनुभूती आली, अशी माहिती रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज शुक्रवारी दिली.
बंगळुरू येथे आज सकाळी रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. सभेच्या पहिल्या सत्रानंतर डॉ. वैद्य यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले. ते म्हणाले की, अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर हे केवळ मंदिर नाही. प्रभू श्रीराम हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहेत, चरित्र आहेत. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या काळात १९५१ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले होते की, मंदिर आपल्या सांस्कृतिक जागरुकतेचे केंद्र राहिले आहे. आज राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे. ज्या दिवशी भारतात सांस्कृतिक मूल्ये आणि भारताची समृद्धी त्या उंचीपर्यंत पोहोचेल, तेव्हाच या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण होईल.
या संदर्भात तसे पाहिले, तर संपूर्ण भारताला एकाच सूत्रात जोडण्याची भावनात्मक शक्ती प्रभू रामचंद्रच आहेत. त्यांना परमेश्वर माना अथवा नाकारा, पण त्यांना आपण सांस्कृतिक मूल्याचे प्रतीक निश्चितच मानतो, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.
प्रतिनिधी सभेची बैठक प्रत्येक वर्षी होत असते आणि यात आम्ही वर्षभरातील संघ कार्याचे विश्लेषण करीत असतो, तसेच पुढील वर्षीच्या कार्याची तयारी करतो. या बैठकीत नव्या सरकार्यवाहांची निवडणूकही होणार आहे. याशिवाय, पुढील तीन वर्षातील संघाच्या कार्यावरही चर्चा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
सेवा भारतीच्या माध्यमातून कार्य
कोरोना संकटात स्वयंसेवकांनी देशभरात सेवा भारतीच्या माध्यमातून ९२,६५६ स्थानांवर सेवा कार्य केले. यात ५ लाख ६० हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. ७३ लाख रेशन किट वितरित करण्यात आल्या, ४.५० कोटी लोकांना भोजनाचे पॅकेट्स वितरित करण्यात आले. ९० लाखांवर मुखाच्छादनांचे वाटप केले, २० लाख स्थलांतरित कामगारांची मदत केली, २.५० लाख भटक्या लोकांना मदत मिळाली. केवळ संघच नाही, तर समाजातील अनेक संघटना, मठ, मंदिरे, गुरुद्वारांनीही या काळात समाजाची सेवा केली, अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली.
तीन वर्षांत सर्व मंडळांपर्यंत पोहोचणार
मागील वर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत आता ८९ टक्के शाखा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. संघाचे कार्य देशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आहे. देशात ६४९५ तालुक्यांपैकी ८५ टक्के तालुक्यांमध्ये संघाचे कार्य आहे. ५८,५०० मंडळांपैकी ४० टक्के मंडळांमध्ये शाखा आणि २० टक्के मंडळांमध्ये संघाचा संपर्क आहे. पुढील तीन वर्षांमध्ये सर्वच मंडळांपर्यंत संघकार्य पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
राममंदिरावरही चर्चा
बैठकीच्या पुढील सत्रात कोरोना काळातील समाजाचा सहभाग, भारताने जगापुढे ठेवलेला आदर्श, अनेक देशांना केलेला कोरोना लसींचा पुरवठा, यावर चर्चा होईल आणि अभिनंदन प्रस्तावही सादर केला जाणार आहे. सोबतच, श्रीराममंदिराबाबत आलेल्या प्रस्तावावरही चर्चा होईल, असे ते म्हणाले.
संघ ओळखण्यासाठी समाज उत्सुक
कोरोनाचा संकटकाळ आणि श्रीराममंदिर जनसंपर्क अभियानाच्या काळात असे लक्षात आले की, संघकार्य माहीत करून घेण्यासाठी समाज उत्सुक आहे. याच अनुषंगाने प्रत्येक ठिकाणी संघ परिचय वर्ग आयोजित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. संघाशी संलग्न होणार्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. सामाजिक परिवर्तनासाठी संघासोबत कार्य करण्याकरिता उत्सुक असलेले लोकही आमच्या संपर्कात आले. या सर्वांना सोबत घेऊन, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने जास्तीत जास्त कार्य कसे केले जाईल, तसेच आगामी तीन वर्षांच्या काळात संघकार्याचा विस्तार, स्वयंसेवकांचा विकास यावरही चर्चा केली जाणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले.
शाखा बंद असतानाही स्वयंसेवक सक्रिय
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मार्च ते जून या काळात संघकार्य पूर्णपणे बंद होते, शाखाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. जुलैपासून हळूहळू शाखा सुरू करण्यात आल्या. शाखा बंद असतानाही स्वयंसेवक सक्रिय होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटात समाजाला मदत करण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच देशभरात स्वयंसेवक सक्रिय होते. अन्य देशांमध्ये, जिथे कल्याणकारी राज्ये प्रभावी होती, तिथे राज्यांची यंत्रणाही सक्रिय होती. मात्र, भारतात सरकारी आणि प्रशासकीय सेवांसोबतच समाजही सहकार्य करीत होता. पूर, भूकंपाच्या काळात सेवा करणे हा वेगळा भाग आहे, पण कोरोना संकटाच्या काळात धोका असल्याचे माहीत असूनही स्वयंसेवकांनी अहमहमिकेने सेवाकार्य केले आहे, असे डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.