किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलकेंद्र सरकारने जारी केले नवे ऍप,
नवी दिल्ली, १८ मार्च –
रेशन दुकानावर धान्य खरेदी करण्याची प्रक्रिया आता डिजिटल होत आहे, केेंद्र सरकारने ‘मेरा रेशन’ हे मोबाईल ऍप सादर केले आहे. त्यामुळे घरी बसूनच या ऍपवरून रेशनच्या धान्याची नोंदणी करणे शक्य होणार आहे. अर्थात् रेशनच्या दुकानांमध्ये नागरिकांना आता रांगा लावण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळणार आहे.
‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ ही योजना केंद्र सरकारतर्फे मागील वर्षी सुरू करण्यात आली. त्याच योजनेचा भाग म्हणून हे ऍप सादर करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे ऍप आपल्या मोबाईलमध्ये कसे डाऊनलोड करायचे, याची पद्धतही यात देण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोअरवर गेल्यानंतर, सर्च बॉक्समध्ये ‘मेरा रेशन’ या ऍपवर जाऊन, ते इन्स्टॉल करण्यात यावे. त्यात आपल्या रेशन कार्डमधील माहिती सादर केल्यानंतर या योजनेचा घरबसल्या फायदा घेणे शक्य होणार आहे.
ऍपचे फायदे
सातत्याने बदली, स्थलांतर होणार्या लोकांना या ऍपचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या ऍपद्वारे रेशन दुकानाची सविस्तर माहिती मिळेल. रेशन कार्डधारक या ऍपद्वारे स्वतःच्या सूचनाही सांगू शकतात. आपल्याला नेमके किती व कोणते धान्य मिळणार आहे, याचीही माहिती मिळेल. लोकांना त्यांच्यापासून सर्वांत जवळ असलेल्या रास्त धान्य दुकानाची माहिती मिळेल. आपली पात्रता, अलिकडील काळात केलेले व्यवहार याबाबतची माहिती त्यातून मिळू शकेल. सध्या हे ऍप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच ते आणखी १४ भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार आहे.
‘‘वन नेशन वन रेशनकार्ड योजनेच्या अनुषंगाने सर्व लाभार्थी, खासकरून प्रवासी लाभार्थी, रेशन दुकानांचे डीलर आणि सर्वच घटकांसाठी ही प्रक्रिया सोपी करणे, हाच ऍप सादर करण्यामागील उद्देश आहे.’’
सुधांशू पांडे, अन्न खात्याचे सचिव