किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी,
नवी दिल्ली, १९ मार्च – देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक सुरू असताना, इलेक्टोरल (निवडणूक) रोख्यांची विक्री करता येऊ शकते का, या मुद्यावर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. येत्या २४ मार्चला यावर सुनावणी होणार आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने ही याचिका दाखल केली आहे. केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुडुचेरीत निवडणुका होत असताना, या रोख्यांची विक्री करणे म्हणजे राजकीय पक्षांना अवैध मार्गाने निधी जमा करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे असेल, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. येत्या १ एप्रिलला या रोख्यांच्या नव्या संचाची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे या याचिकेवर याच महिन्यात सुनावणी केली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली. त्यावर न्यायालयाने तयारी दर्शवली. निवडणुकीच्या काळातील राजकीय पक्षांच्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी २०१८ मध्ये या रोख्यांची सुरुवात केली होती. हे रोखे वर्षातून चार वेळा म्हणजे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबरमध्ये जारी केले जातात. या रोख्यांमुळे निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराला आळा बसावा, हा केंद्र सरकारचा यामागील उद्देश आहे. राजकीय पक्षांना या रोख्यांच्या माध्यमातून कोणकोण निधी, देणग्या देते, याची माहिती सार्वजनिक करता येणार नसल्याचे केंद्रीय माहिती आयोगाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये स्पष्ट केले होते.