किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअनेक बड्या व्यावसायिकांचा सहभाग,
नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – जागतिक गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेचे येत्या ५ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नॅशनल इन्व्हेंस्टमेंट निधीतर्फे ही परिषद बोलावण्यात आली आहे.
जगभरातील बडे व्यावसायिक यात आभासी सहभागी होणार आहेत. यात भारतातून मुकेश अंबानी, रतन टाटा, नंदन निलेकणी आणि दीपक पारेख यांचाही सहभाग होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील सहभागी असतील. याशिवाय, अमेरिका, युरोप, कॅनडा, कोरिया, जपान, मध्यपूर्व, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर येथील बडे व्यावसायिक आणि सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
जागतिक गुंतवणुकीला आकर्षित करण्यावर भारत सरकार यातून भर देणार आहे. विशेष म्हणजे, या गोलमेज परिषदेत जे देश सहभागी होणार आहेत, त्यातील २० बड्या व्यावसायिकांची एकूण संपत्ती सुमारे ६ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. यातील बरेच व्यावसायिक भारतासोबत प्रथमच काम करण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीच्या संधींची देणार माहिती
या परिषदेत अर्थ मंत्रालयातर्फे भारतीय अर्थव्यवस्था, येथील गुंतवणुकीच्या असंख्य संधी, पायाभूत सुधारणा आणि पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत सरकारचे धोरण याविषयीची माहिती जागतिक गुंतवणूकदारांना देण्यात येणार आहे.
अर्थव्यवस्था गतिशील झाली : तरुण बजाज
दरम्यान, आर्थिक व्यवहारविषयक सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्राप्त झाली आहे. अर्थतज्ज्ञांनी केलेल्या भाकितापेक्षाही जास्त वेगाने अर्थव्यवस्था बळकट होऊ लागली आहे. घ(वृत्तसंस्था)
पाच महिन्यांत सर्वाधिक विदेशी गुंतवणूक
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांच्या काळात भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक झालेली आहे. या जागतिक गोलमेज परिषदेमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे भारतासोबतचे संबंध आणखी बळकट होईल आणि गुंतवणूकही वाढणार आहे. असंख्य विदेशी गुंतवणूकदार भारतात येण्यासाठी इच्छूक असल्याने, ही परिषद त्यांच्यासाठी फार मोठी संधीच राहणार आहे, असे अर्थ मंत्रालयाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.