किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.84°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांची दुसरी खेप उद्या बुधवारी प्राप्त होणार आहे. ही विमाने भारताकडे रवाना करण्यात आली असून, अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत.
आज मंगळवारी या विमानांनी भारताकडे झेप घेतली असून, कुठेही न थांबता ती भारतात पोहोचणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्समधील इस्ट्रेस ते जामनगर असा हा निरंतर प्रवास असणार आहे. या विमानांसोबत हवेत इंधन भरणारी विमानेही राहणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
ही तीन राफेल विमाने भारतात सुरक्षित आणण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सरकारी आणि हवाई दलाच्या पातळीवर समन्वय साधण्यात आला असून, दोन्ही देशांचे अधिकारी एकमेकांच्या सातत्याने संपर्कात आहेत.
या तीन विमानांच्या आगमनानंतर भारतीय हवाई दलाकडे राफेल लढाऊ विमानांची संख्या आठ होणार आहे. भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला असून, हा संपूर्ण व्यवहार ५९ हजार कोटी रुपयांचा आहे.
पाकी जेएफ-१७ विमाने जमिनीवरच
इस्लामाबाद – राफेलचा सामना करू शकतील असे जे-२० लढाऊ विमानांचे संयुक्त उत्पादन पाकिस्तान आणि चीन करीत आहे. मात्र, पाकिस्तान वायुदलाची ४० टक्के जेएफ-१७ विमाने विविध कारणांनी जमिनीवरच असल्याचा माहिती सूत्रांनी दिली. या विमानांत बांधणीशी संबंधित अडचणी उद्भवल्या असून, त्या लवकर सुटणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जेएफ-१७ विमानाची विजेवरील कॅनोपीत बिघाड निर्माण झाला आहे. अशाच प्रकारचा बिघाड जेएफ-१७ बी विमानांतही निर्माण झाला. यामुळे आपात्कालीन परिस्थितीत वैमानिकाला पॅराशूटच्या मदतीने विमानाबाहेर उडी घेणे अडचणीचे किंवा जवळपास अशक्य असल्याचा धोका आहे.
केवळ इतकेच नव्हे, तर विमानाच्या सांगाड्यातही दोष आढळले आहेत. गुरुत्वाकर्षणाचा सर्वाधिक दबाव असलेल्या विमानाच्या खालच्या भागाला तडा गेल्याचे पाकिस्तानी वायुदलाला आढळले आहे. पंख आणि सांगाड्याच्या भागातही तडे गेलेले आढळले आहेत. पंखांची जोडणी असलेला भाग विमानाला मजबुती देतात. मात्र, उड्डाणांवेळी दबाव वाढल्याने नेमक्या त्याच भागांना तडे गेल्याचे वायुदलाला आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काही विमानांतील समोरचे भाग देखील तुटले असून, या माध्यमातून विमानाचा सांगाडा कमकुवत असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. विमानातील रडार यंत्रणा आणि त्याची उपकरणे अत्यंत जड असल्याचा परिणामही या विमानावर होत असल्याचे समजते.