किमान तापमान : 29.24° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलमाजी परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांचा दावा,
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट – भारताने अमेरिकेसोबत २००७-०८ साली केलेला अणुकरार रोखण्यासाठी चीनने देशातील डाव्यांना हाताशी धरले होते. या डाव्या नेत्यांच्या माध्यमातून अणुकराराच्या विरोधातील एक फळी निर्माण करण्याचा प्रयत्न चीनने केला होता, असा धक्कादायक दावा माजी परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी केला आहे. भारतातील राजकारणात चीन सक्रिय झाल्याचे हे पहिले उदाहरण असावे, असे त्यांनी सांगितले.
विजय गोखले यांचे ‘द लॉंग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ हे पुस्तक अलिकडेच प्रकाशित झाले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात २००७-०९ या काळात गोखले अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. याकाळात गोखले चीनसोबत बोलणी करीत होते. याच काळात करारावर चर्चा सुरू होती आणि बीजिंगने नमती भूमिका घेतल्यानंतर भारताला अणुपुरवठादार समूहाकडून मोठी सूट देण्यात आली होती.
भारत-अमेरिका अणुकरारात चीनकडून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा विजय गोखले यांनी या पुस्तकात केला आहे. चीनने भारतातील डाव्या पक्षांशी असलेल्या संबंधांचा वापर केला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माक्सर्वादी) या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बैठक वा उपचारासाठी चीनला जायचे. सीमावाद आणि द्विपक्षीय संबंधासह अन्य मुद्यांवर दोन्ही पक्षांची भूमिका राष्ट्रवादी होती. पण, चीनला भारत-अमेरिका यांच्यात होणार्या अणुकराराची चिंता सतावत होती, असे गोखले यांनी पुस्तकात म्हटले आहे.
डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये डाव्यांचा किती प्रभाव आहे, याविषयी चीनला कल्पना होती आणि भारत अमेरिकेकडे झुकेल, या भीतीवर चीनने खेळी केली. भारतीय राजकारणात चीनने हस्तक्षेप केल्याचे हे पहिले उदाहरण असू शकते. हे करताना चीनने स्वतःला पडद्यामागे ठेवले होते. चीनने डावे पक्ष आणि डाव्या विचारांच्या माध्यमांतून अणुकराराविरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला, असे गोखले यांनी म्हटले आहे.
गोखलेंचा दावा तथ्यहीन ः डावे पक्ष
माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी केलेला दावा तथ्यहीन असून, आम्ही या दाव्याची निंदा करतो, असे भाकपा आणि माकपा या डाव्या पक्षांनी सांगितले.