किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.3°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलसायकलने संसदभवनात पोहोचले विरोधी पक्षांचे नेते,
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट – कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मंगळवारी बोलावलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीवर बसपा आणि आम आदमी पार्टीने बहिष्कार घातला. बैठकीनंतर राहुल गांधी आणि अन्य नेते सायकलने संसदभवनात पोहोचले.
पेगासस, शेतकरी आंदोलन तसेच अन्य अनेक मुद्यांवर सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची भूमिका ठरवण्यासाठी राहुल गांधी यांनी आज सकाळी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला १४ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. बसपा तसेच आपचे नेते मात्र सहभागी झाले नाहीत.
या बैठकीला तृणमूल कॉंग्रेसचे कल्याण बॅनर्जी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे संजय राऊत, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, द्रमुकच्या कनिमोळी, माकप, भाकपा, आरएसपी, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, आययुएमएल, आरएसपी, केरळ कॉंग्रेस मणी गट, लोकतांत्रिक जनता दल आदी पक्षांचे नेते उपस्थित होते.
या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांच्या एकजुटीवर राहुल गांधी यांनी जोर दिला. विरोधी पक्ष नेते एकत्र आले तर जनतेचा आवाज आणखी मजबूत होईल, त्यामुळे जनतेचा आवाज दडपणे कोणालाच शक्य हाणार नाही, असे ते म्हणाले.
या बैठकीनंतर राहुल गांधी आणि अन्य पक्षांचे सायकलवरून संसदभवनात पोहोचले. सायकलवर गॅस सिलेंडरचे तसेच इंधनाचे भाव कमी करण्याच्या मागणीचे पोस्टर्स लावण्यात आले होते.
राहुल गांधी यांनी नंतर ट्विट करत आपल्या सायकल यात्रेचे छायाचित्र टाकले. ‘जन जन की आवाज, महंगाई कम करो, गरिबों को मारना बंद करो, संसद मे इन सवालो पर बहस करो’, असे आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले.
या बैठकीची आम्हाला महितीच नव्हती, असे बसपा खासदार रितेश पांडे यांनी म्हटले आहे. एकच मुद्दा आहे, तर अशा बैठकीची गरजच काय, अशी विचारणा त्यांनी केली. या बैठकीचे आम्हाला निमंत्रणच नव्हते, असे शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी म्हटले. विरोधी पक्ष एकजूट असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खडगे यांनी म्हटले.