किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२१ फेब्रुवारी ) – देशात युपीआयच्या माध्यमातून ज्या गतीने डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे, ते पाहू जाता लवकरच रोखीचे व्यवहार मागे पडतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. आर्थिक व्यवहारांसाठी युपीआय हे देशातील सर्वांत पसंतीचे आणि प्राधान्याचे माध्यम झाले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. युपीआय आणि सिंगापूरच्या पे-नाऊ या दोन सीमापार व्यवहार करणार्या माध्यमांना आज एकत्र जोडण्यात आले.
हा कार्यक्रम आभासी माध्यमातून पार पडला असून, यावेळी पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली हसिन लूंग उपस्थित होते. अर्थात् यामुळे भारतीय रुपयाला अधिक बळकटी मिळणार आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, २०२२ या एकाच वर्षात युपीआयच्या माध्यमातून ७४ अब्ज व्यवहार झाले. यात १२६ ट्रिलियन रुपयांची उलाढाल झाली असून, ही रक्कम दोन ट्रिलियन सिंगापूर डॉलर्स इतकी आहे. अनेक तज्ज्ञांचे असे मत आहे की, देशात युपीआयच्या माध्यमातून होणारे व्यवहार लवकरच रोख व्यवहारांची जागा घेणार आहे. कारण, रोखीपेक्षाही युपीआयचे व्यवहार अधिक सुरक्षित आहेत, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
युपीआय-पे नाऊमध्ये सेवा सुरू
या कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूरच्या मानेटरी अॅथॉरिटीचे व्यवस्थापकीय संचालक रवी मेनन यांनी या दोन्ही डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर आर्थिक व्यवहार यशस्वीपणे पार पाडला. या सेवांचा वापर करणार्या ग्राहकांना त्यांच्या डिजिटल अॅपचा वापर करून जलद गतीने निधी स्थानांतरित करण्यासोबतच इतर प्रकारचे आर्थिक व्यवहार सहजपणे करता येणार आहेत, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात दिली.
‘‘यात भारतीय स्टेट बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून दोन्ही देशांमध्ये आर्थिक व्यवहार करता येणार आहेत; तर अॅक्सिस बँक आणि डीबीएसच्या माध्यमातून देशातील व्यवहार सुलभ होणार आहेत.’’