किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलपंतप्रधान मोदींनी साधला पॅरालिम्पिकपटूंशी संवाद,
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट – तुम्ही सर्व विजेते व ‘रोल मॉडेल’ आहात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या अव्वल पॅरालिम्पिकपटूंशी संवाद साधताना म्हटले. सर्व भारतीय पॅरालिम्पिकपटू आगामी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी सज्ज आहेत.
२०१६च्या रिओ पॅरालिम्पिकचे सुवर्णपदक विजेते देवेंद्र झाझरिया व मरिअप्पन थंगावेलू यांच्यासह मोदींनी १० खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना कोणतेही दडपण न ठेवता स्पर्धा करण्याचे आवाहन केले. टोकियो पॅरालिम्पिक २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी असूनही तुम्ही धीर सोडला नाही व लढत राहिलात. तुमच्या मेहनतीमुळे व दृढ इच्छाशक्तीमुळे तुम्ही सर्व अडचणींविरुद्ध या टप्प्यावर पोहोचलात. तुम्ही सर्वात मोठ्या क्रीडा महाकुंभात देशाचे प्रतिनिधित्व करीत आहात, असे मोदी म्हणाले.
तुम्ही सर्व विजेते आणि आदर्श आहात. तुम्ही दबावाने खेळू नये. तुम्ही आपला सर्वोत्तम खेळ करून पदके जिंकाल, अशी मला आशा आहे. तुमचा देशाला अभिमान वाटेल, असेही ते म्हणाले.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा ५४ सदस्यीय संघ भाग घेत असून हा आतापर्यंतच्या कामगिरीपेक्षा सर्वोत्तम कामगिरी बजावेल, अशी आशा आहे. २००४ व २०१६ नंतर देवेंद्र झाझरियाचे हे तिसरे ऑलिम्पिक असून देवेंद्रसह (एफ-४६ भालाफेक), मारियप्पन (टी -६३ उंच उडी) व विश्वविजेता संदीप चौधरी (एफ -६४ भालाफेक) आदिंकडून पदक मिळण्याची आशा आहे. भारत नऊ क्रीडा प्रकारात आपले कौशल्य दाखविणार आहे. गत रिओ ऑलिम्पिकमध्ये मरियप्पनने सुवर्णपदक जिंकले होते. मरियप्पन टोकियो पॅरालिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक असेल. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. आम्ही पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत १२ पदके जिंकली आहेत. गत काही वर्षांत पॅरा-ऍथ्लिट्सने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी बजावली आहे, असा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. भारत २७ ऑगस्ट रोजी पुरुष व महिलांच्या तिरंदाजी स्पर्धेने भारत पॅरालिम्पिकमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.