किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 27.13° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.13° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, १७ ऑगस्ट – तालिबानने अफगाणिस्तानवर घेतलेल्या ताब्यानंतर तेथून येणारे छायाचित्र आणि चित्रफिती अत्यंत धक्कादायक आहेत. काबुलमध्ये एका बागेत लपलेल्या शेकडो महिला बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीत राहणार्या एका अफगाण वंशाच्या नागरिकाचे म्हणणे आहे की, काबुलमधील प्रसिद्ध शहर-ए-नवा बागेमधील महिलांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गाव सोडले होते. बागेत लपलेल्या शेकडो महिला आता बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता महिलांचे नातेवाईक त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मी आठ वर्षांपूर्वी अफगाणिस्तान सोडले असले, तरी तेथील ठोस माहिती देणारे अनेक महत्त्वाचे स्रोत माझ्याकडे आहेत, असा दावा या व्यक्तीने केला आहे.
बॉम्बस्फोट, गोळीबार आणि हवाई हल्ले अफगाणिस्तानच्या लोकांसाठी नवीन नाहीत. आम्हाला लहानपणापासूनच त्याची सवय होती. अफगाणिस्तानातील तरुणांचे विशेषतः तरुणी आणि महिलांचे प्राण कायमच धोक्यात असतात. आमच्याकडे तरुणांचे प्राण कायम धोक्यात आसतात. कारण, तालिबानी बळजबरीने महिलांना आणि मुलींना घरातून उचलून नेतात. अनेक वर्षांपासून ही परिस्थिती आहे. सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे त्याने सांगितले. तलिबानने पूर्ण देशावर ताबा घेतला आहे. लोक देश सोडून जात आहेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना जबाबदार धरले पाहिजे. हे सर्व एका रात्रीत घडलेले नाही. त्यांनी देशातील सर्व प्रांत ताब्यात घेतले आणि अफगाणिस्तान सरकार गप्प राहिले असल्याचा आरोप या अफगाणी नागरिकाने केला.
भारतीयांच्या सुटकेसाठी अजित डोवाल सक्रिय
अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर परिस्थिती आणखीच चिघळली आहे. अफगाणमधील अशा कठीण प्रसंगी तिथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आव्हान भारतासमोर आहे. याच संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सक्रिय झाले आहेत. अजित डोवाल यांनी याच संदर्भात अमेरिकेतील त्यांच्या समकक्षांसोबत संवाद साधला. अफगाणिस्तानात अडकून पडलेल्या भारतीय नागरिक आणि अधिकार्यांना सुखरूप बाहेर काढण्यासंबंधी या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. काबुलमधील सध्याची परिस्थिती ध्यानात घेता भारताचे राजदूत आणि त्यांचे भारतीय कर्मचार्यांना तत्काळ देशात परत आणण्यात येईल, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.