किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १७ ऑगस्ट – अफगाणिस्तानवर तालिबानने मिळवलेल्या वर्चस्वानंतर भारत, अमेरिकेसह जगातील अनेक देशांचे लक्ष अफगाणिस्तानातील हालचालींवर आहे. याच संदर्भात भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटोनी ब्लिंकेन यांनी संवाद साधला.
अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या उच्च राजनायिकांनी अफगाणिस्तानातील संबंधांवर चर्चा केली. यानंतर काही वेळातच एस. जयशंकर यांनी एक ट्विट केले. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री ब्लिंकेन यांच्यासोबत अफगाणमधील सद्यःस्थितीवर चर्चा केली. आम्ही काबुलमध्ये विमानतळ संचालन बहाल करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. यासंबंधी अमेरिकेचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत, असे जयशंकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काबुलमध्ये अडकून पडलेल्या शीख आणि हिंदू नेत्यांसोबत आम्ही संपर्कात आहोत. त्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे, असेही जयशंकर यांनी म्हटले. काबुलमध्ये अडकून पडलेले नागरिक परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात, असे आवाहनही जयशंकर यांनी समाजमाध्यमावर केले.