किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलडॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
मुंबई, १६ ऑगस्ट – आपल्या देशाला स्वातंत्र्य तर मिळाले, पण ते टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना जबाबदार बनणे आवश्यक आहे. त्या योग्यतेचा बोध आपल्याला आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगावरून येतो. सर्वागीण समृद्धीसाठी या रंगांचा आपल्या आयुष्यात उपयोग करून आपल्याला घेऊन पुढे जायचे आहे. देश आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करायचा आहे. देश स्वावलंबी झाला, तरच तो सुरक्षित राहू शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
दादर (पू.) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित राजा शिवाजी विद्यालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने सरसंघचालक बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरविंद वैद्य, सरचिटणीस शैलेंद्र गाडसे, सतीश नायक आदी उपस्थित होते.
आपल्या आर्थिक दृष्टीचे लक्ष्य म्हणजे सर्वांचे सुख. त्याकरिता भौतिक कामनांची तृप्ती आणि सर्वांच्या सुखाचे परमलक्ष्य प्राप्त आणि आपल्यातील समाधान प्राप्त करण्यासाठी बळ आवश्यक आहे आणि बळ अर्थ साधनातून येते. आत्मनिर्भर होताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा. छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. जे आपल्या देशात तयार होत नाही, जे अत्यावश्यक आहे, तेच आपण आयात करायचे आहे. आपल्या अटींवर घ्यायचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.
राष्ट्रध्वजातील रंगांवरून योग्यता कळते
आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले, पण ते टिकवून ठेवण्यासाठी लोकांना योग्य बनणे आवश्यक आहे. ती योग्यता आपल्याला आपला राष्ट्रध्वज पाहून कळते. शीर्षस्थानी असलेला भगवा रंग त्याग, कर्म आणि प्रकाशाच्या दिशेने नेण्याची प्रेरणा देतो. ते आपले लक्ष्य आहे. आपल्याला जगात अशी मानवता हवी आहे. मनुष्याचे जीवन ‘असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय’ हे परमलक्ष्याकडे घेऊन जाणार्या एका यात्रेचे वर्णन आहे अशा पद्धतीने चालणारी निरंतर यात्रा आहे. आपल्याला असा समाज घडवायचा आहे, संपूर्ण जगाला असे बनवायचे आहे. हे करतेवेळी आपल्याला हे लक्षात ठेवायचे आहे की, आपला हा उद्देश जितका पवित्र, शुद्ध आहे, तितकेच त्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न, आपली वृत्ती शुद्ध आणि निर्मळ असावी, शीलता असावी, त्याचे प्रतीक म्हणजे पांढरा रंग आहे.
हे सर्व करण्यासाठी जी शक्ती हवी, जी वैभवसंपन्नता हवी, सामर्थ्य हवे, समृद्धी हवी, या सर्वांचे परिपाक म्हणजे समग्रता. आपण श्रीसुक्त म्हणतो. त्यात सर्वांचे वर्णन आहे. निसर्गाने बहाल केलेली साधनसामग्री, पर्यावरण, भौतिक सुख-सुविधा या सर्वांचा जेव्हा उल्लेख होतो, आपल्या मन, शीलाच्या श्रीमंतीबरोबरच भौतिक श्रीमंती या दोन्हीच्या बळांवर मनुष्य जीवनात परमलक्ष्य प्राप्त करतो. त्या समृद्धीचा रंग म्हणजे हिरवा आहे. आपण जे काही करणार आहोत, त्याचे अधिष्ठान काय असणार आहे, ते म्हणजे आपल्या तिरंग्यामधील धर्मचक्र. सर्वांना आनंद देणारा, आनंदात राहणारा, चराचर सृष्टीची धारणा ज्याला आपण धर्म म्हणतो, असे धर्मकेंद्रीत आपले प्रयत्न असायला हवेत, असेही डॉ. भागवत यांनी नमूद केले.
मनाचे समाधान महत्त्वाचे
जीवनात सुखप्राप्तीसाठी माणूस जगत असतो. जेवढे सुख तेवढा आनंद, पण भारतीय ज्या सुखाबद्दल अनुभव घेत आहेत. तो आनंद म्हणजे केवळ भौतिक सूख नाही, तर सूख आपल्या अंतरात आहे, हे ते जाणतात. सुख-दुःख वृत्ती आपल्या चित्तवृत्तीत अवलंबून असते. मनाचे समाधान खूप महत्त्वाचे असून, त्यावर सर्व काही अवलंबून असते. केवळ एक माणूस सुखी राहू शकत नाही. इतर सर्व जोपर्यंत सुखी होणार नाहीत, तोपर्यंत एक व्यक्ती सुखी राहू शकत नाही. आपल्यासोबत सर्वांना सुखी ठेवणे हा आपला धर्म आहे. सर्वांचे सुख हीच आपली धारणा असायला हवी, असेही सरसंघचालक म्हणाले.