किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.79°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.11°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१९ फेब्रुवारी) – खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा भारतात आंदोलन करणार्या शेतकर्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असून शेतकर्यांनी भारतीय अधिकार्यांविरुद्ध शस्त्रे उचलावीत असा एक नवीन व्हिडिओ जारी केला आहे. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे अमेरिकेत बसलेला हा खलिस्तानी दहशतवादी एकामागून एक व्हिडीओ जारी करून भारतात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत भारताविरुद्ध विष ओकत आहे, मात्र बाइडेन प्रशासन त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीये.
गुरपतवंत सिंग पन्नून हे प्रतिबंधित खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसचे संस्थापक आणि वकील आहेत, ज्यांच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे. वृत्तानुसार, ज्या वेळी भारतात शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि हरियाणा-पंजाबच्या शंभू सीमेवर शेतकरी उभे आहेत, अशा वेळी या खलिस्तानी दहशतवाद्याने भारताविरोधात विष ओकत एक व्हिडिओ जारी केला आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या करतारपूर सीमेजवळ शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. शेतकर्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतानाच शेतकर्यांनी या हत्यारांचा वापर करून केंद्र सरकारच्या विरोधात आपले मुद्दे मांडावेत, असे पन्नून यांनी म्हटले आहे.
पन्नूनने शेतकर्यांना भडकावल्याचे आणि शेतकर्यांनी अधिकार्यांविरुद्ध शस्त्रे वापरावीत, जेणेकरून सरकार त्यांचे म्हणणे मान्य करण्यास तयार होईल, असे या अहवालात म्हटले आहे. भारत सरकारच्या गोळ्यांना तुम्हीही गोळ्यांनी उत्तर द्या, करतारपूर सीमेवर तुमच्यासाठी शस्त्रे ठेवली आहेत, असे पन्नूनने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अहवालानुसार, भारत सरकारच्या उच्च अधिकार्यांनी म्हटले आहे की ते पन्नूनच्या व्हिडिओची चौकशी करत आहेत आणि अधिकार्यांनी पुष्टी केली आहे की पन्नून शेतकर्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे.
शेतकरी आंदोलनाचा आज सातवा दिवस असून पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकरी अजूनही अडकले आहेत. शेतकर्यांनी १३ फेब्रुवारी रोजी ’दिल्ली चलो अभियान’ सुरू केले होते, परंतु यावेळी त्यांना हरियाणा-पंजाब सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्थेत रोखण्यात आले.