किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– ४२ वर्षांनंतर पुन्हा काम सुरू,
पाटणा/भागलपूर, (१९ फेब्रुवारी) – बिहारच्या भागरपूल जिल्ह्यातील अंतीचक गावात आठव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा नवव्या शतकाच्या पूर्वार्धात पाल राजा धर्मपालाने स्थापन केलेल्या विक्रमशीला महाविहाराचे आणखी अवशेष शोधण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने जवळपास ४२ वर्षांनंतर पुन्हा उत्खनन सुरू केले. विक्रमशीला महाविहार विद्यापीठ तेराव्या शतकाच्या सुरुवातीस कोसळण्यापूर्वी सुमारे चार शतके समृद्ध होते. तत्पूर्वी, पुरातत्त्व विभागाने १९७२ ते १९८२ या कालाधीत केलेल्या सूक्ष्म उत्खननात त्याच्या मध्यभागी क्रुसाच्या आकाराचा स्तुप आणि विशाल मठ, एक वाचनालय तसेच नवसाच्या परिपूर्तीसाठी स्तुपांचा समूह आढळले, असे पाटणा सर्कलमधील पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ गौतमी भट्टाचार्य यांनी सांगितले.
आता आम्ही ८ फेब्रुवारीपासून उत्खनन सुरू केले आहे. पूर्वी उत्खनन करण्यात आलेल खंदक स्वच्छ करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यात साठलेली माती आम्ही काढून टाकत आहोत आणि अबाधित सांस्कृतिक क्षितिजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत, जिथून आम्ही पद्धतशीर उत्खनन सुरू करू शकू, असे भट्टाचार्य यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. डॉ. बी. एस. वर्मा यांनी क्रमशीला उत्खनन प्रकल्पाच्या अंतर्गत या जागेचे पूर्वी उत्खनन केले होते. भागलपूरमधील जागेचे उत्खनन सहाय्यक अधीक्षक जलजकुमार तिवारी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. नालंदा आणि ओदंतपुरीसह पाल साम्राज्यादरम्यान भारतातील तीन सर्वांत महत्त्वाच्या बौद्ध मठांपैकी हा एक होता. विक्रमशीला हे शंभराहून अधिक शिक्षक आणि सुमारे एक हजार विद्यार्थी असलेले सर्वांत मोठे बौद्ध विद्यापीठ होते. या विद्यापीठातून प्रख्यात विद्वान निर्माण झाले, ज्यांना बौद्ध शिक्षण, संस्कृती आणि धर्माचा प्रसार करण्यासाठी परदेशातून अनेकदा आमंत्रित केले गेले.