किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – देशातील पहिली अमृतभारत ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली आहे. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे. ही एक पुल-पुश ट्रेन आहे, ज्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस किंवा ईएमयू ट्रेन कमी वेळात वेग पकडते, त्याचप्रमाणे ही अमृत भारत देखील वेग पकडेल. त्याचे मार्गही जवळपास निश्चित झाले आहेत. लवकरच पहिली ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. अमृत भारत एक्सप्रेसचा रंग भगवा असेल. त्याचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयुच्या धर्तीवर असेल, जे पूर्णपणे भगवा रंगाचे असेल. तर कोचच्या खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असेल. रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डब्यांची ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने धावेल.
देशातील कामगार, कष्टकर्यांना डोळ्यासमोर ठेवून अमृत भारताची निर्मिती करण्यात आली आहे. यात स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असतील. पुल-पुश तंत्रज्ञानामुळे अमृत भारत ट्रेन जलद गतीने उचलू शकेल आणि वेग वाढेल. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस आणि वंदे भारतच्या धर्तीवर सर्वसामान्यांची ही ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने धावेल. त्याचे भाडे सामान्य ठेवण्यात येईल. देशातील पहिली अमृत भारत एकाच वेळी दोन मार्गांवर धावेल, एक चित्तौड़गढ एक्सप्रेस आणि दुसरी तामिळनाडू एक्सप्रेस असेल अशी शक्यता आहे. मार्गही जवळपास निश्चित झाले आहेत. नंतर अमृत भारत गाड्या उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, झारखंड, गुजरात, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील राज्यांदरम्यान धावतील. कारण या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आहेत.