किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– अर्थव्यवस्थेतील तेजीचा परिणाम,
नवी दिल्ली, (१० डिसेंबर) – देशातील वीज वापरात वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलने ही वाढ नऊ टक्के आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत देशातील विजेचा एकूण वापर १०९९.९० अब्ज युनिट्स झाला. मागील वर्षी समान कालावधीत १०१०.२० अब्ज युनिट्स विजेचा वापर झाला होता.
२०२१-२२ मध्ये एप्रिल-नोव्हेंबर कालावधीत ऊर्जेचा एकूण वापर ९१६ अब्ज युनिट्स विजेचा वापर झाला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या दरम्यान एकूण ऊर्जा वापर १५०४.२६ अब्ज युनिट झाला, जो आर्थिक २०२१-२२ च्या १,३७४ युनिट्सच्या तुलनेत जास्त आहे. या आर्थिक वर्षातील पहिल्या आठ महिन्यांत विजेच्या वापरात झालेली नऊ टक्के वाढ ही अर्थव्यवस्थेत आलेल्या तेजीमुळे असल्याचे ऊर्जाक्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०१३-१४ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये विजेचा वापर ५०.८ टक्क्यांनी वाढला असल्याचे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. qसह यांनी मागील काही दिवसांपूर्वी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले. २०१३-१४ मध्ये विजेची सर्वाधिक मागणी १३६ गिगावॉट होती, २०२३ मध्ये ही मागणी वाढून २४३ गिगावॉट झाली आहे. आपण या क्षमतेत १९४ गिगावॉट वाढ केली आहे, असे आर. के. सिंह यांनी स्पष्ट केले. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढून २२९ गिगावॉटपर्यंत पोहोचण्याची शक्यता ऊर्जा मंत्रालयाने वर्तवली आहे.