किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, २१ मार्च – देशात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला आता प्रचंड वेग आला असून, आतापर्यंत चार कोटींपेक्षा जास्त लोकांना लस टोचण्यात आली आहे. केंंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली.
आतापर्यंत ४ कोटी २० लाख ६३ हजार ३९२ लोकांना लस देण्यात आली आहे. त्यात ७७ लाख ६ हजार ८३९ लोकांना कोरोनाच्या लसीची पहिली मात्रा व ४८ लाख ४ हजार २८५ लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ६० वर्षांवरील १ कोटी ५९ लाख ५३ हजार ९७३ लोकांचे लसीकरण पार पडले असून, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या ३२ लाख २३ हजार ६१२ लोकांनाही लस देण्यात आली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. लसीकरणात अमेरिकेनंतर भारत जगात दुसर्या क्रमांकावर आहे.
पाच राज्यांचा वाटा ८३ टक्के
दरम्यान, मागील चोवीस तासांत देशात ४३,८४६ नव्या बाधितांची भर पडली आहे. अवघ्या तीन दिवसांत एक लाखावर बाधित आढळून आल्याने चिंता वाढली आहे. देशातील एकूण संक्रमितांची संख्या आता १ कोटी १५ लाख ९९ हजार १३० झाली आहे. याच काळात २७ हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाल्याने, हा आकडा १ कोटी ११ लाख ३० हजार २८८ च्या घरात गेला आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असून, ते आता ९५.९६ टक्क्यांवर आले आहे. विशेष म्हणजे, नव्या बाधितांमध्ये पाच राज्यांचा वाटा ८३ टक्के इतका असून, यातही महाराष्ट्र २७,१२६ बाधितांसह आघाडीवर आहे.
याच काळात १९७ लोकांचा मृत्यू झाल्याने, हा आकडा १ लाख ५९ हजार ७५५ इतका झाला आहे. हे प्रमाण अजूनही १.३८ टक्क्यांवर कायम आहे. सक्रिय बाधितांचा आकडाही वेगाने वाढत आहे. देशात सध्या ३,०९,०८७ सक्रिय बाधित आहेत.