किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २१ मार्च – भारताकडे जगातले चौथे मजबूत लष्कर असून, चीन पहिल्या स्थानावर आहे, असा निष्कर्ष मिलिटरी डायरेक्ट या संकेतस्थळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या संस्थेने रविवारी अहवाल जारी केला.
मोठ्या प्रमाणात लष्करावर खर्च केला जात असतानाही ७४ गुणांसह अमेरिका दुसर्या क्रमांकावर आहे. ६९ गुणांसह रशिया तिसर्या क्रमांकावर, ६१ गुणांसह भारत चौथ्या, तर ५८ गुणांसह फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक १० शक्तिशाली लष्करांच्या यादीत ब्रिटन ४३ गुणांसह नवव्या स्थानावर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली तरतूद, सक्रिय आणि निष्क्रिय असलेल्या जवानांची संख्या, जमीन, हवा, सागरी आणि अणू संसाधने, सरासरी वेतन तसेच लष्करी उपकरणांचा विचार करून हा अंतिम लष्करी सामर्थ्याचा निर्देशांक तयार करण्यात आल्याचे या अभ्यासात मिलिटरी डायरेक्टने म्हटले आहे.
१०० गुणांपैकी ८२ गुण मिळवून चिनी लष्कराने या निर्देशांकात सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या गुणांच्या आधारे अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी असलेली तरतूद, वायुदल आणि नौदलाच्या क्षमतेचा विचार केला असता, काल्पनिक संघर्षात चिनी लष्कर अव्वल दर्जाचे ठरेल असा निष्कर्ष काढण्यात आल्याची माहिती मिलिटरी डायरेक्टने दिली.
काल्पनिक सागरी युद्धात चीन, हवाई युद्धात अमेरिका आणि जमिनीवरील युद्धात रशिया सर्वश्रेष्ठ आहे, असेही या अभ्यासात म्हटले आहे. १४,१४१ विमानांसह रशिया आणि चीनविरुद्धच्या काल्पनिक युद्धात अमेरिका जिंकू शकेल. अमेरिका आणि चीनविरुद्धच्या जमिनीवरील युद्धात रशिया जिंकू शकेल. या देशाकडे ५४,८६६, अमेरिकेकडे ५०,३२६ आणि चीनकडे ४१,४६१ वाहने असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे. चीनकडे ४०६ नौका असून, काल्पनिक सागरी युद्धात हा देश रशिया आणि अमेरिकेच्या विरोधात विजय मिळवू शकेल, असा निष्कर्ष काढण्यात आला.
अमेरिकेचा संरक्षणावर सर्वाधिक खर्च
अमेरिकेत दरवर्षी संरक्षण क्षेत्रावर ७३२ अब्ज डॉलर्स खर्च केला जातो. जगातील हा सर्वांत मोठा खर्च आहे, अशी नोंद या अहवालात आहे. संरक्षण क्षेत्रावरील खर्चात चीन दुसर्या स्थानावर आहे. हा देश दरवर्षी २६१ अब्ज डॉलर्सचा खर्च संरक्षणावर करतो. त्यानंतर तिसर्या स्थानावरील भारत दरवर्षी ७१ अब्ज डॉलर्सचा खर्च संरक्षण क्षेत्रावर करतो.