किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.3°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलबंगळुरू, २० मार्च –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची दोन दिवसीय बैठक काल बंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत काल, शनिवारी होसबळे यांची ही निवड करण्यात आली.
वाढत्या वयोमानामुळे आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी इच्छा भय्याजी जोशी यांनी व्यक्त केल्यामुळे त्यांच्या जागी दत्तात्रेय होसबळे यांची निवड प्रतिनिधी सभेने केली, अशी माहिती संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सहसरकार्यवाह अरुण कुमार यांनी दिली. भय्याजी जोशी यांची प्रकृती ठणठणीत असल्याचेही अरुण कुमार यांनी सांगितले.
अल्पपरिचय
रा. स्व. संघाचे नूतन सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांचा जन्म कर्नाटकच्या शिमोगा जिल्ह्यातील सोराबा तालुक्यात १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
दत्तात्रेय होसबळे १९६८ मध्ये म्हणजेच, वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले आणि १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभागी झाले. पुढल्या काळात सुमारे १५ वर्षे ते विद्यार्थी परिषदेचे अ. भा. संघटन मंत्री राहिले. १९७५ ते ७७ या काळात जेपी आंदोलनातही ते सक्रिय होते आणि मिसा कायद्यांतर्गत सुमारे पावणेदोन वर्ष त्यांनी कारावासही भोगला. कारागृहात त्यांनी दोन हस्तलिखित पत्रिकांचे संपादन केले.
१९७८ मध्ये ते नागपूर नगर संपर्क प्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेत पूर्णकालीन कार्यकर्ता या नात्याने आले. विद्यार्थी परिषदेत त्यांनी इतर अनेक जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडताना, राष्ट्रीय संघटन मंत्री ही अतिशय महत्त्वाची जबाबदारीही पार पाडली.
गुवाहाटीत युवा विकास केंद्राच्या संचालनातही त्यांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण राहिली आहे. अंदमान-निकोबार द्वीप समूह आणि ईशान्य भारतात विद्यार्थी परिषदेच्या कार्य विस्तारातही त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
दत्तात्रेय होसबळे यांनी नेपाळ, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि अमेरिकेलाही भेटी दिल्या आहेत. त्यांनी अनेकदा संपूर्ण भारतभ्रमणही केले आहे. नेपाळमधील भीषण भूकंपानंतर रा. स्व. संघाद्वारे पाठविण्यात आलेल्या मदत व बचाव दलाचे प्रमुख म्हणून ते नेपाळलादेखील गेले होते. तिथे त्यांनी अनेक दिवस सेवाकार्य केले. २००४ मध्ये त्यांच्याकडे संघाचे अ. भा. सहबौद्धिक प्रमुख दायित्व देण्यात आले. त्यानंतर २००८ पासून ते शनिवार दि. २० मार्च २०२१ पर्यंत सह-सरकार्यवाह म्हणून कार्य करत होते. आता ते सरकार्यवाह झाले आहेत. दत्तात्रेय होसबळे यांचे मातृभाषा कन्नडसोबतच इंग्रजी, हिंदी, संस्कृत, तमिळ, मराठी यासह अनेक भारतीय भाषांवर प्रभुत्व आहे. याशिवाय, काही विदेशी भाषाही त्यांना अवगत आहेत. लोकप्रिय कन्नड मासिक ‘असीमा’चे ते संस्थापक संपादकही आहेत.