किमान तापमान : 29.81° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 43 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.3°से. - 31.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलसुनील आंबेकर अ. भा. प्रचारप्रमुख,
रा. स्व. संघाच्या नवीन केंद्रीय पदाधिकार्यांची घोषणा,
नवी दिल्ली, २१ मार्च –
बंगळुरू येथे झालेल्या रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची घोषणा करण्यात आली. नवीन सरकार्यवाह म्हणून दत्तात्रेय होसबळे यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत प्रचारप्रमुख म्हणून उत्तरदायित्व असलेल्या अरुण कुमार यांची सहसरकार्यवाह म्हणून निवड झाली.
आतापर्यंत सहप्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी असलेल्या सुनील आंबेकर यांच्याकडे अ. भा. प्रचार प्रमुखपदाचे दायित्व सोपविण्यात आले आहे. आलोक कुमार यांना सहप्रचारप्रमुख करण्यात आले असून, रामलाल यांना अ. भा. संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. राम माधव यांना भाजपातून परत बोलावून त्यांची संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
संघाचे नवे राष्ट्रीय पदाधिकारी पुढीलप्रमाणे
सरसंघचालक : डॉ. मोहनजी भागवत
सरकार्यवाह : दत्तात्रेय होसबळे
सहसरकार्यवाह : डॉ. मनमोहन वैद्य, डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त चक्रधर
शारीरिक प्रमुख : सुनील कुळकर्णी
सहशारीरिक प्रमुख : जगदीशप्रसाद
बौद्धिक प्रमुख : स्वांतरंजन
सहबौद्धिक प्रमुख : सुनील भाई मेहता
व्यवस्था प्रमुख : मंगेश भेंडे
सहव्यवस्था प्रमुख : अनिल ओक
सेवाप्रमुख : पराग अभ्यंकर
सहसेवा प्रमुख : राजकुमार मटाले
संपर्कप्रमुख : रामलाल
सहसंपर्क प्रमुख : सुनील देशपांडे, रमेश पप्पा
प्रचार प्रमुख : सुनील आंबेकर
सहप्रचार प्रमुख : नरेंद्र ठाकूर, आलोक कुमार
प्रचारक प्रमुख : सुरेशचंद्र
सहप्रचारक प्रमुख : अद्वैतचरण, अरुण जैन
अ. भा. कुटुंब प्रबोधन गतिविधी प्रमुख : डॉ. रवींद्र शंकर जोशी
सर्वश्री भय्याजी जोशी, सुरेश सोनी, राम माधव, भागय्याजी, सुहासराव हिरेमठ, इंद्रेश कुमार, प्रो. अनिरुद्ध देशपांडे आणि उल्हास कुळकर्णी यांचा अ. भा. कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
गणेश शेटे विदर्भ प्रांत प्रचारक
गणेश शेटे यांच्याकडे विदर्भ प्रांत प्रचारक म्हणून, तर परीक्षित जावडे यांच्याकडे सहप्रांत प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यांच्याकडे क्रीडा भारतीचे दायित्व सोपविण्यात आले आहे.