किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.19° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (२८ मे) – नवे संसद भवन आज देशाला औपचारिकपणे समर्पित करण्यात आले. यापुढे देशाला दिशा देण्याचे आणि प्रगतिपथावर नेण्याचे काम या भवनातून होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उदघाटन समारंभावर बहिष्कार घालण्याची घोषणा काँग्रेस आणि देशातील २० राजकीय पक्षांनी केली होती. संसद भवनाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाही तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र जवळपास दोन डझन राजकीय पक्षांनी आजच्या कार्यक्रमात सहभागी होत, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांना घरचा अहेर केला. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या बहिष्कारांचे कोणतेही सावट आजच्या कार्यक‘मावर दिसून आले नाही. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन तसेच माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यावेळी उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशीही यावेळी प्रामुख्याने उपस्थित होतेे.
आजच्या कार्यक्रमासाठी नवीन संसद भवनाची इमारत एखाद्या नववधुप्रमाणे सजवण्यात आली होती. नवीन संसद भवनातील लोकसभेची इमारत मोराच्या प्रतिकृतीसारखी तर, राज्यसभेची रचना कमळासारखी आहे. उद्घाटन समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. यात परदेशांचे राजदूत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, केंद्र शासनाचे सचिव पातळीवरील अधिकारी, तिन्ही सेनादलांचे प्रमुख तसेच कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोकसभेतील निमंत्रितांच्या सहा दीर्घाही खचाखच भरल्या होत्या. विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपालांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरयाणाचे मनोहरलाल खट्टर, आसामचे हेमंत बिस्व शर्मा, आंध्रप्रदेशचे जगनमोहन रेड्डी, गोव्याचे प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. मुख्यमंत्री तसेच राज्यपालांची बसण्याची व्यवस्था लोकसभेच्या सभागृहात खासदारांजवळ करण्यात आली होती.
भाजपा खासदारांमध्ये आजच्या कार्यक‘मासाठी प्रचंड उत्साह दिसून येत होता. महिला आणि पुरुष खासदार नव्या लोकसभेत गटागटाने छायाचित्र तसेच सेल्फी काढण्यात गुंतले होते. बर्याच कालावधीनंतर सुमित्रा महाजन संसद भवनात आल्या. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन्, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी नमस्कार करून त्यांची विचारपूस केली. डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनाही अनेक मंत्र्यांनी आणि खासदारांनी अभिवादन केले. शिंदे गटाचे खासदार भगवे फेटे घालून आजच्या समारंभासाठी लोकसभेत उपस्थित होते. सभागृहात येताना आणि परत जाताना पंतप्रधान मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांना अभिवादन करीत त्यांची विचारपूस केली.