किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादल-रजनीकांत यांनी मानले पंतप्रधानांचे आभार,
चेन्नई, (२८ मे) – नवीन संसद भवनाच्या लोकार्पण प्रसंगी तामिळी नागरिकांचा यथोचित गौरव केल्याबद्दल प्रख्यात अभिनेता रजनीकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या ट्विट संदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सकाळी दिल्लीतील रायसिना हिल्समधील संसदेच्या नव्या इमारतीचे औपचारिक लोकार्पण केले. यावेळी त्यांनी तामिळनाडूतील चोलवंशीय राजवटीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता.
संपूर्ण देशाला तामिळनाडूच्या गौरवशाली संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. नवीन संसद भवनात या महान राज्याच्या संस्कृतीचा गौरव होताना पाहणे निश्चितच आनंदाची बाब आहे, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले होते. यावर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तामिळनाडूतील राजवटीचे पारंपरिक प्रतीक राजदंड (सेंगोल)च्या माध्यमातून नव्या संसद भवनात प्रथमच तामिळी नागरिकांचा यथोचित गौरव करण्यात आला, यासाठी पंतप्रधान मोदी यांना मनापासून धन्यवाद, अशी प्रतिकि‘या रजनीकांत यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीत तामिळनाडूच्या आदिनम संतांच्या हस्ते सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक पवित्र राजदंड सेंगोलचा स्वीकार केला होता. संसदेच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात आज पंतप्रधानांनी लोकसभेच्या सभापतींच्या जागेजवळ याची प्रतिष्ठापना केली व शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतही तामिळनाडूची संस्कृती अजूनही जिवंत आणि समृद्ध आहे व ही परंपरा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आदिनम संतांनी पार पूर्ण केली आहे तसेच याचे श्रेय पीडित, शोषित, वंचित सर्वांना जाते, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात म्हटले होते.