किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– केंद्र सरकारचा निर्णय,
नवी दिल्ली, (३ जून) – केंद्र सरकारने १४ औषधांवर बंदी घातली आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने (डीजीसीआय) आरोग्यास धोका निर्माण करणार्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने शुक्रवारी हा निर्णय जारी केला आहे. भारत सरकारने १४ प्रकारच्या फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांचा संबंधित रोगांवर होणारा परिणाम आणि उपचारात्मकतेबाबत स्पष्टता नसल्याचे आढळून आल्याने डीसीजीआयने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने आता १४ प्रकारांच्या एफडी कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे.
डीजीसीआयच्या तज्ज्ञ समितीने आधी १४ प्रकारांची एफडी कॉम्बिनेशन असणारी औषधं मानवी आरोग्यासाठी घातक असून, त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. डीसीजीआयने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने या पृष्ठभूमीवर मोठे पाऊल उचलत या औषधांवर बंदी घातली आहे. दोन किंवा अधिक घटक एकाच औषधात एकत्र मिसळलेले असणे म्हणजे फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन होय. यामध्ये निमेसुलाइड + पॅरासिटेमॉल डिस्पेर्सिबल गोळ्या आणि फोल्कोडिन + प्रोमेथाझाईनसारख्या घटकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने शुक‘वारी १४ फिक्स्ड-डोज कॉम्बिनेशन औषधांवर उपचारात्मक स्पष्टता नसल्याच्या कारणावरून बंदी घातली आहे. फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन ही अशी औषधे असतात, ज्यामध्ये एका गोळीमध्ये एकापेक्षा जास्त औषधे एकत्र असतात. यांनाच ‘कॉकटेल’ औषधे असेही म्हटले जाते.
या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी
केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तज्ज्ञ समितीने या औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. या औषधांच्या उपचारात्मकतेबाबत स्पष्टता नाही आणि यामुळे मानवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या १४ एफडीसी औषधांचे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे, असे सांगितले आहे. तज्ज्ञ समिती आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळाच्या शिफारशींच्या आधारे हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.