किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन,
ऋषिकेश, (३ जून) – १४२ कोटी लोक भारताचा कणा आहेत. धर्म आणि संस्कृती आचरणात आणणे आवश्यक आहे. आमच्या धर्मातील तत्त्वांचे प्रत्यक्षपणे पालन करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या ७२ व्या जन्मदिनानिमित्त शनिवारी आश्रमात आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.
डॉ. मोहनजी भागवत पुढे म्हणाले, आमची संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. मात्र, भारतीय संस्कृतीच्या उत्थानासाठी प्रयत्न करावे लागतील. आपली सृष्टी सनातन धर्मावर आधारित आहे, धर्म नसेल तर सृष्टी नाही. म्हणून हे ओळखून जे त्याचे पालन करतात ते सुखी होतील. आज जगभरात पर्यावरणाची चर्चा होत आहे. आम्हाला त्यासाठी काम करावे लागत आहे. आपल्या भूमीत सर्व काही आहे. आम्ही ६००० वर्षांपासून शेती करीत आहोत आणि आजही करीत आहोत. ज्या गोष्टी विज्ञानासाठी उपयोगी आहेत त्या आपल्या वेदांमध्ये उपलब्ध आहेत. आमच्याकडे आधीपासूनच ज्ञानाबरोबरच विज्ञानही आहे.
मात्र, असे असूनही सनातन धर्म आपले कार्य करीत असल्याचे सरसंघचालक म्हणाले. सनातन धर्म आपल्या नियमानुसार कार्य करेल. त्याला ओळखून आम्हाला ते संस्कार स्वीकारून त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे तरच आम्ही सुखी व आनंदी होऊ. धर्माला आमची गरज नाही, तर आम्हाला धर्माची गरज आहे. स्वामी चिदानंद मुनींना त्यांचा जन्मदिन साजरा करण्याची गरज नाही. मात्र, ते जे कार्य करीत आहेत ते आमच्या जीवनात आणण्याची गरज आहे. संतांच्या आचरणात धर्म असतो, धर्म सर्वत्र कार्य करतो, असेही सरसंघचालक म्हणाले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला. संत एकांतात आत्मसाधना आणि समाजात लोकसाधना करतात, असेही डॉ. मोहनजी भागवत यांनी यावेळी सांगितले.
जगद्गुरू शंकराचार्यांपासून महामंडलेश्वर स्वामी असंगानंद महाराजांच्या परंपरेतील सर्व संतांना अभिवादन करताना स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले, गंगेच्या या पवित्र तीरावर आणि हिमालयाच्या पवित्र पर्वतरांगांमधून आवाहन करण्याची वेळ आली आहे. भारताचे ऊर्जावान पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगात भारताची प्रतिष्ठा वाढवत आहेत. त्यांना ही संस्कृती आणि संस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेले आहेत, कारण ही व्यक्तीची नाही तर वैश्विक संघटना आहे.
यावेळी जुना पीठाधिश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराज म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण जगाला योग, आयुर्वेद आणि भारतातील विविध विद्याशाखांची ओळख झाली आहे. जगभरात जी संस्कृती वेगाने सकारात्मकतेने पसरत आहे ती भारताची संस्कृती आहे. आरोग्य, सौंदर्य, समाधान आणि आनंद देणारी संस्कृती ही भारताची संस्कृती आहे.