किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.98° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.98° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलस्वदेशी इंजीनचा केला वापर,
चांदीपूर, ११ ऑगस्ट – एक हजार किलोमीटरपर्यंतची अचूक मारक क्षमता असलेल्या निर्भय क्षेपणास्त्राची आज बुधवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने यशस्वी चाचणी केली. विशेष म्हणजे, या चाचणीसाठी स्वदेशी इंजीनचा वापर करण्यात आला.
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी अपयशी ठरली होती. आज सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी ओडिशाच्या चांदीपूरच्या प्रक्षेपण केंद्रावरून निर्भय क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी १०० किलोमीटर अंतरावर लक्ष्य निर्धारित करण्यात आले. लक्ष्यापर्यंत पोहोचून अचूक वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्राला १५ मिनिटे लागली. आता आम्ही लवकरच एक हजार किलोमीटर अंतरावर लक्ष्य निर्धारित करून, या क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहोत, अशी माहिती डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकार्याने दिली.
आजचे यश अंशत: असले, तरी आमच्यासाठी ते महत्त्वाचे आहे. कारण, मागील वर्षी ऑक्टोबरमधील चाचणी अपयशी ठरल्यानंतर ही चाचणी प्रायोगिक तत्त्वावर होती. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या इंजीनची देखील या अनुषंगाने चाचणी घेण्यात आली. दोन्ही चाचण्या यशस्वी राहिल्याने आता आम्ही या क्षेपणास्त्राची परिपूर्ण चाचणी घेणार आहोत, असे अधिकार्याने सांगितले.
आता लष्कर करणार तीन चाचण्या
हे क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराकडे सोपविण्यात येणार असून, लवकरच लष्कराकडून त्याच्या तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्यानंतर त्याचा लष्करात समावेश करण्यात येईल. प
वातावरणाचा परिणाम नाही
निर्भय हे सबसोनिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र ०.७ ते ०.९ मॅक या वेगाने झेपावते. समुद्रात आणि पर्वतीय भागांमध्येही अचूक मारा करण्याची त्याची क्षमता असून, कोणत्याही वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही. शिवाय, शत्रूंच्या रडारला चकमा देण्यासाठी त्याच्यात विशेष यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचा मारा करण्याचा टप्पा एक हजार किमीचा असला, तरी १५०० किमीपर्यंत मारा करण्याची त्याची क्षमता आहे.
चीनच्या सीमेवर होणार तैनात
लष्करी स्तरावर तिन्ही चाचण्या यशस्वी झाल्यानंतर हे क्षेपणास्त्र चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात करण्यात येणार आहे. विशेषत: पूर्व लडाखच्या सीमेवरील तणावानंतर हे क्षेपणास्त्र चीनला धडकी भरविणार आहे.