किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलराज्यसभेत पुन्हा फेकले कागद,
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट – मागील अधिवेशनात झालेल्या उत्कृष्ट कामकाजाला यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कलंक लागला असून, विरोधकांनी आणखी एक खोडसाळपणा केला. राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या भावनिक आवाहनाचा कोणताही परिणाम विरोधकांवर झाला नाही. आज बुधवारी देखील त्यांनी कागद फाडून फेकले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज आज सायंकाळी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.
मंगळवारी निर्लज्जपणे गोंधळ घातल्यानंतर राज्यसभेत विरोधकांनी आजही मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. हौदात उतरलेल्या विरोधकांनी जोरदार नारेबाजी केली आणि कित्येक सदस्यांनी कागद फाडून फेकले.
यातही कळस म्हणजे, अजूनही अधिवेशनाचा कालावधी शिल्लक असताना, जनहितासाठी अधिवेशन सुरू न ठेवता, सरकारने ते गुंडाळले असल्याचा आरोप कॉंगे्रसने केला आहे.
विरोधकांचे कृत्य असंसदीय : व्यंकय्या नायडू
कृषी कायद्यांना विरोध करताना मंगळवारी सभागृहात काही सदस्यांनी जो गोंधळ घातला, असंसदीय कृत्य केले, त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य संपले, अशा शब्दांत राज्यसभेचे उपाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज बुधवारी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. भावना व्यक्त करताना नायडू यांना दाटून आले, त्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगले.
मंगळवारी सभागृहात विरोधाच्या सर्व मर्यादा पायदळी तुडवण्यात आल्या. एक सदस्य महासचिवांसमोरील टेबलवर चढला, दुसर्याने नियमांचे पुस्तक फेकले, अन्य सदस्य या टेबलवरच बसून राहिले, याचा उल्लेख करत नायडू म्हणाले की, या सदस्यांनी आपल्या वागणुकीने सभागृहाची प्रतिष्ठा मातीमोल केली.
पावसाळी अधिवेशनात काही सदस्यांनी सभागृहात अभूतपूर्व असा गोंधळ घातला. तुम्ही सभागृहात कोणत्याही मुद्यांवर चर्चा करू शकता, तुमचे मत वेगळे राहू शकते, पण तुम्ही ज्या पद्धतीने गोंधळ घातला, तो प्रकार दु:खदायक आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, नायडू आपली नाराजी व्यक्त करत असतानाही सभागृहात विरोधी सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. आसनावरून जे सांगितले जात आहे, ते तुम्हाला ऐकावेच लागेल, असे नायडू म्हणाले.
सदस्यांची मंगळवारची वागणूक हा सभागृहाचा अपमान आहे. मंदिरात गर्भगृह खूप महत्वाचे व पवित्र असते. लोकशाहीत हे सभागृह म्हणजे मंदिरच आहे. याठिकाणी महासचिव आणि अन्य अधिकारी बसतात, काही सदस्यांनी काल याठिकाणी गैरवर्तन केले, संपत्तीचे नुकसान केले, असे ते म्हणाले. सभागृहात गोंधळ घालणार्या सदस्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून गृहमंत्री अमित शाह, सभागृहाचे नेते पीयष गोयल तसेच भाजपा खासदारांनी आज सकाळी नायडू यांची भेट घेतली.