किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (६ फेब्रुवारी ) – नासा आणि इस्रो द्वारे संयुक्तपणे विकसित केलेला पृथ्वी-निरीक्षण उपग्रह सप्टेंबरमध्ये संभाव्य प्रक्षेपणासाठी या महिन्याच्या शेवटी भारतात पाठवला जाणार आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या जमिनीचा आणि बर्फाच्या पृष्ठभागाचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यास मदत करेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सिंथेटिक अपर्चर रडार (एनआयएसएआर, ’निसार’) उपग्रह भारतात पाठवण्यापूर्वी त्याची अंतिम विद्युत चाचणी घेतली. चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीला (जेपीएल) भेट दिली.
हे मिशन एक विज्ञान साधन म्हणून रडारच्या क्षमतेचे एक शक्तिशाली प्रात्यक्षिक असेल आणि पृथ्वीच्या गतिमान जमीन आणि बर्फाच्या पृष्ठभागांबद्दल पूर्वीपेक्षा अधिक माहिती देईल, असे सोमनाथ यांनी उपग्रह सोडण्यापूर्वी जेपीएल येथे आयोजित औपचारिक समारंभात सांगितले. अभ्यासात भारताची मदत मिळेल. कार्यक्रमाला दोन्ही अंतराळ संस्थांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.
इस्रो आणि नासा यांनी २०१४ मध्ये २,८०० किलो वजनाचा उपग्रह तयार करण्यासाठी हातमिळवणी केली होती. मार्च २०२१ मध्ये, इस्रो ने भारतात विकसित केलेला एस-बँड एसएंआर पेलोड जेपीएल द्वारे उत्पादित एल-बँड पेलोडसह एकत्रीकरणासाठी नासा कडे पाठवला. दोन्ही देशांच्या अंतराळ संस्थांनी भविष्यातही अनेक नवीन प्रकल्पांवर एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे. पृथ्वी निरीक्षण उपग्रहाशिवाय इतर ग्रहांवरील मोहिमांचाही त्यात समावेश असेल. दोन्ही देशांच्या उच्च अधिकार्यांमध्ये एक करारही झाला आहे. अलीकडेच भारत आणि अमेरिकेच्या अधिकार्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी एक बैठकही घेतली होती.