किमान तापमान : 24.27° से.
कमाल तापमान : 24.82° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 3.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.27° से.
23.74°से. - 24.75°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – भारतीय नौदल आणि डीआरडीओने मंगळवारी स्वदेशी बनावटीच्या नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. सीकिंग ४२बी हेलिकॉप्टरमधून ही चाचणी घेण्यात आली. महत्त्वाच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने ही चाचणी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. चाचणीदरम्यान नौदल आणि डीआरडीओच्या उच्च अधिकार्यांनीही या चाचणीवर लक्ष ठेवले. भारतीय नौदलाने केलेल्या या चाचणीत क्षेपणास्त्राच्या साधक आणि मार्गदर्शन तंत्रज्ञानाचीही चाचणी घेण्यात आली. कोणत्याही क्षेपणास्त्राच्या लक्ष्यावर मारा करणे हे मार्गदर्शन तंत्रज्ञानाचा एक भाग आहे.
क्षेपणास्त्र किती प्रभावी आहे हे त्याच्या मार्गदर्शन तंत्रज्ञानावर अवलंबून असते. नौदलाने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरने समुद्रावरून उड्डाण करणारे जहाज विरोधी क्षेपणास्त्र डागल्याचे दिसत आहे, ज्याने आपल्या लक्ष्यावर यशस्वीरित्या मारा केला. यापूर्वी गेल्या वर्षी मे महिन्यातही नौदलाने डीआरडीओच्या सहकार्याने जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. भारत सरकार संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, डीआरडीओ, संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि आयुध निर्माणी मंडळ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. सध्या आपला देश शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावर परदेशी देशांवर अवलंबून आहे, परंतु आता सरकार शस्त्रास्त्रांची आयात रोखण्यासाठी देशात शस्त्रास्त्र निर्मिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी करार करत आहे. सध्या, एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाद्वारे देशात चार क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या जात आहेत, ज्यात पृथ्वी क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र, त्रिशूल आणि नाग क्षेपणास्त्र प्रणाली यांचा समावेश आहे.