किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.91° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.91° से.
23.74°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले,
नवी दिल्ली, (२१ नोव्हेंबर) – दिल्ली सरकारने वचन देऊनही रिजनल रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टिम (आरआरटीएस) प्रकल्पाला निधी दिला नाही. तिथेच, हे सरकार स्वत:ला प्रसिद्धी देणार्या जाहिरातींवर मोठा खर्च करीत आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले.
दिल्ली सरकार न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करीत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित करताना तुमच्या जाहिरातींच्या बजेटला स्थगिती देऊन तो आरआरटीएस प्रकल्पाकडे वळवू, अशी कठोर सूचना केली. दिल्ली सरकारने वचन पाळले नाही, यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरकारचा जाहिरातींवर होणारा खर्च आठवडाभरात प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा आदेश न्या. संजय किशन कौल आणि न्या. सुधांशू यांच्या न्यायासनाने दिला.
प्रकल्पासाठी ४१५ कोटी रुपये दिले जातील, असे दिल्ली सरकारने एप्रिलमध्ये म्हटले होते. आरआरटीएस प्रकल्पामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होणार असल्याचे न्यायासनाने म्हटले. सरकारने मागील तीन वर्षांत जाहिरातींवर ११०० कोटी रुपये खर्च केला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात ५५० कोटी रुपयांचा निधी जाहिरातींसाठी दिला. प्रकल्प रखडवून जाहिरातींवर खर्च केला जात असेल, तर आम्ही जाहिरातींचा निधी प्रकल्पांसाठी हस्तांतरित करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.