किमान तापमान : 29.23° से.
कमाल तापमान : 32.4° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 37 %
वायू वेग : 4.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.4° से.
26.15°से. - 33.99°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर कुछ बादल25.15°से. - 29.97°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.09°से. - 29.93°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.93°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.59°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.37°से. - 29.3°से.
रविवार, 24 नोव्हेंबर साफ आकाशथिम्पू, १७ डिसेंबर – भूतान सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करणार आहे. हा पुरस्कार मैत्रिपूर्ण संबंध आणि सहकार्यासाठी दिला जाणार आहे. भूतान सरकारने पंतप्रधान मोदी यांना ‘नगदग पेल जी खोरलो’ सन्मान देण्याची घोषणा केली आहे. याआधीही पंतप्रधान मोदी यांना अनेक देशांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून ट्विटरवर घोषणा करण्यात आली. यात म्हटले आहे की, भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी भूतानसाठी जे सहकार्य आणि पाठिंबा दिला, ते अतुलनीय आहे. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. भूतानवासियांकडून मोदी यांना खूप खूप शुभेच्छा. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधानांना त्यांच्या अभूतपूर्व नेतृत्व आणि दृढनिश्चयामुळे हा सन्मान मिळाला. ही सर्व देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.