किमान तापमान : 30.9° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 27 %
वायू वेग : 1.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
26.7°से. - 32.99°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.76°से. - 29.61°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.53°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.55°से. - 29.52°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.15°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.81°से. - 28.84°से.
रविवार, 24 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, १८ डिसेंबर – यावर्षी भारतातील मोबाईल वापरकर्त्यांच्या फोनवर एकाच क्रमांकावरून २० कोटी ‘स्पॅम कॉल्स’ करण्यात आले आहेत, अशी धक्कादायक समोर आली आहे. नुकतेच ‘ट्रू कॉलर’ या मोबाईल ऍपने २०२१ मधील जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा जागतिक ‘स्पॅम कॉल्स’ अहवाल जाहीर केला आहे.
ट्रू कॉलर हे खूप लोकप्रिय ऍप आहे. तुमच्या फोनवर येणार्या प्रत्येक कॉलचे लोकेशन, कॉल करणार्या व्यक्तीचे नाव आणि इतर डेटा जमा करून त्या माहितीची नोंद करून ठेवण्याचे काम हे ऍप करते. या स्पॅम कॉल्सच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.
ट्रू कॉलरच्या मते, एका स्पॅमरने या वर्षात भारतात तब्बल २० कोटी स्पॅम कॉल केले आहेत. याचा अर्थ, दररोज एकाच फोन क्रमांकावरून सुमारे ६ लाख ६४ हजार लोकांना फोन केले जात होते. प्रत्येक तासाचा विचार केल्यास या स्पॅमरने दर तासाला २७ हजार लोकांना स्पॅम कॉल करून त्रास दिला आहे.
भारतात दर महिन्याला प्रत्येक युजरला १६ पेक्षा जास्त स्पॅम कॉल येतात. एकूण स्पॅम कॉल्सचा विचार केला तर, ट्रू कॉलर युजर्सला सुमारे ३.८ अब्ज स्पॅम कॉल आले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. ट्रू कॉलरच्या अव्वल २० सर्वाधिक स्पॅम कॉल येणार्या देशांच्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षी भारत नवव्या स्थानावर होता. यात ब्राझील पहिल्या, तर पेरू या दक्षिण अमेरिकन खंडातील देशाचा दुसरा क्रमांक लागतो.
स्पॅम कॉल्समध्ये सर्वांत जास्त कॉल टेलिमार्केटिंगचे व फायनान्शियल सर्व्हिसेसचे असतात. स्पॅम कॉलच्या माध्यमातून केवायसी व ओटीपीचा वापर करून सर्वाधिक फसवणूक केली जाते. फसवणूक करणारे युजर्सला विविध सुविधा देण्याचे व केवायसी करण्याचे आमिष दाखवून त्यांचे बँक डिटेल्स व ओटीपी विचारतात. डिटेल्स व ओटीपी मिळाल्यानंतर सहज फसवणूक करता येते, असे अहवालात उघड झाले आहे.
गत काही वर्षांमध्ये स्पॅम कॉल्सचा वापर करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा कॉलवर काही गोपनीय माहिती विचारण्यात आली, तर ती देऊ नये. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी माहिती न देणे, हा सर्वात उत्तम पर्याय आहे.