किमान तापमान : 31.05° से.
कमाल तापमान : 31.68° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 38 %
वायू वेग : 1.58 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.68° से.
26.32°से. - 31.99°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर कुछ बादल25.15°से. - 29.97°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.09°से. - 29.93°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.08°से. - 29.93°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.21°से. - 29.59°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.37°से. - 29.3°से.
रविवार, 24 नोव्हेंबर साफ आकाशअमेरिका, रशियाचीही सहमती,
नवी दिल्ली, १८ डिसेंबर – कित्येक सुरक्षा आव्हानांचा सामना करणार्या सशस्त्र दलांसाठी भारतातच सैन्य उपकरणांची निर्मिती करण्यास तयार असल्याचे अमेरिका, रशिया, फ्रान्ससह कित्येक देशांनी सांगितले आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी दिली.
देशाची भरभराट पाहून अस्वस्थ होणारे शेजारी देवाने आपल्याला दिले आहेत. फाळणीतून निर्माण झालेला एक देश अशक्त होत असून, तो भारताच्या विकासामुळे काळजीत पडला आहे, असे राजनाथसिंह यांनी क्षेत्रीय भू-राजकीय घडामोडींबाबत सांगितले.
अमेरिका, रशिया आणि फ्रान्ससह जगातील बहुतांश देश भारताचे मित्र आहेत, असे राजनाथसिंह यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या (एफआयसीसीआय) वार्षिक अधिवेशनात सांगितले. देशाला आवश्यक असलेली लष्करी उपकरणांची निर्मिती देशातच केली जावी, असे आम्ही यासंदर्भात या देशांना सांगितले आहे.
देशाची सुरक्षा लक्षात घेता आम्हाला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याचे उत्पादन देशातच घ्यायचे आहे, असे आम्ही मित्रदेशांना सांगितले आहे. हा संदेश आम्ही अमेरिका, रशिया, फ्रान्सला दिला असून, इतरांनाही हाच संदेश दिला जाईल. भारत व जगासाठी आवश्यक असलेली सैन्य उपकरणे भारतातच तयार करा, असा स्पष्ट संदेश आम्ही दिला आहे, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
धोरणात्मक मॉडेलअंतर्गत देशात एका इंजिनचा विकास करण्यासाठी भारतासोबत हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी शुक्रवारी सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र, या प्रस्तावाबाबतचे तपशील त्यांनी सांगितले नाही. आम्ही मैत्री कायम ठेवू. मात्र, शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्याचा प्रश्न असेल, तर त्याचे उत्पादन देशातच घ्यावे लागेल, असे आम्ही स्पष्ट केले असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.