किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 42 %
वायू वेग : 3.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.23°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलराहुल गांधी यांची टीका,
अमेठी, १८ डिसेंबर – देशातील वाढती महागाई, वेदना आणि दु:खासाठी हिंदुत्ववादी जबाबदार आहेत, अशी टीका कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज शनिवारी येथे झालेल्या सभेत केली. हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या कामांमुळे देशात आज महागाई वाढली आहे. देश वेदना आणि दु:खात जीवन जगत आहे, असे त्यांनी सांगितले.
हिदू आणि हिंदुत्ववाद्यांमध्ये आज लढाई सुरू आहे. हिंदूंना सत्याग्रहात विश्वास असेल तर, हिंदुत्ववाद्यांना सत्ताग्रहात विश्वास असल्याची टीका त्यांनी केली. राहूल गांधी आणि प्रियांका वढेरा यांनी आज अमेठीतून ६ कि. मी.ची रॅली काढली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी आज प्रथमच अमेठीचा दौरा केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगेत डुबकी मारत असताना रोजगारावर मात्र मौन बाळगून आहेत. देशातील तरुणांना आज रोजगार का मिळत नाही, महागाई इतकी झपाट्याने का वाढत आहे, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.
केंद्र सरकार महत्त्वाच्या मुद्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करीत आहे. लडाखमधील भारताची जमीन चीनने बळकावली. मात्र, पंतप्रधान या मुद्यावर बोलण्यास तयार नाहीत. चीनने भारताची जमीन बळकावलेली नाही, असे पंतप्रधान सांगतात. मात्र, चीनने भारताची जमीन बळकावली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.