किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.97°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलविवेक चौधरी यांची माहिती, काही आठवड्यांचा कालावधी लागणार,
हैदराबाद, १८ डिसेंबर – तीनही दलांच्या पथकाकडून हेलिकॉप्टर दुर्घटनेची कोर्ट ऑफ इन्क्वायरी निर्धारित प्रक्रियेप्रमाणे केली जाईल आणि या दुर्घटनेतील प्रत्येक पैलूचा तपास केला जाईल, अशी माहिती वायुदलप्रमुख विवेक चौधरी यांनी आज शनिवारी दिली.
दुंडिगलजवळ असलेल्या वायुदलाच्या अकादमीत झालेल्या संयुक्त पदवी परेडवेळी त्यांनी पत्रकारांना सांगितले की, या चौकशीसाठी काही आठवड्यांचा कालावधी लागणार असून, कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये आढळणार्या तथ्यांवर कोणतेही भाष्य करणार नाही.
कोर्ट ऑफ इन्क्वायरी ही एक निर्धारित प्रक्रिया असल्याने यात आढळणार्या कोणत्याही तथ्यांवर भाष्य करणार नाही. या दुर्घटनेतील प्रत्येक पैलूवर तपास करण्याचा अधिकार एअर मार्शल मानवेंद्रसिंह यांना देण्यात आला आहे. नेमकी काय चूक झाली असेल, यासह प्रत्येक पैलूकडे लक्ष द्या आणि योग्य शिफारसी आणि निष्कर्षांसह अहवाल सादर करा, असे सांगण्यात आले असल्याची माहिती विवेक चौधरी यांनी दिली. दुर्घटनेमागे कोणती कारणे असू शकतात, याचा शोध घेतला जात आहे. आम्ही घाईघाईने कोणतीही घोषणा करणार नाही. त्यामुळे कोर्ट ऑफ इन्क्वायरी पूर्ण होण्यासाठी काही आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही एक अत्यंत पारदर्शी प्रक्रिया असल्याचे मी सांगू इच्छितो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गरज भासल्यास पूर्व लडाखमध्ये तैनाती वाढवू
पूर्व लडाखमध्ये चीनसोबत संघर्ष कायम असून, गरज भासल्यास वायुदल या परिसरात आणखी तैनाती वाढवण्यास सज्ज आहे, अशी माहिती वायुदलप्रमुख विवेक चौधरी यांनी दिली. पूर्व लडाखमधील काही भागांतून सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, या परिसरात चीनसोबत सुरू असलेला संघर्ष संपलेला नाही. मी तपशीलवार माहिती देणार नसलो तरी, तिथे पुरेशी तैनाती आहे. अल्पावधीतच कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे चौधरी यांनी सांगितले.