किमान तापमान : 26.21° से.
कमाल तापमान : 26.65° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.21° से.
25.99°से. - 31.14°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.12°से. - 30.05°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.98°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.2°से. - 29.96°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.23°से. - 29.78°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.26°से. - 29.34°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, १८ डिसेंबर – भारतीय रेल्वेतर्फे महिलांसाठी खास सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बस आणि मेट्रोमध्ये ज्याप्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवल्या जातात, त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेतही महिलांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे.
भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी रेल्वेतील लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांसाठी विशेष बर्थ बनवले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिलांच्या आरामदायी प्रवासासाठी भारतीय रेल्वेने राखीव बर्थसह अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. तर एक्सप्रेस गाड्यांमध्ये, स्लीपर क्लासमध्ये आणि लांब पल्ल्याच्या मेल सहा बर्थ आरक्षित केले जातील, असेही वैष्णव यांनी नमूद केले.
ज्येष्ठ, गर्भवती महिलांना विशेष प्राधान्य
ज्या लांब पल्ल्याच्या मेल गाड्या आहेत गरीब रथ, राजधानी एक्सप्रेस, दुरंतो अशा प्रत्येक गाड्याच्या स्लिपरकोचमध्ये येथून पुढे महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असणार आहेत. सोबतच थ्री-टिअर एसी डब्यातदेखील महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित करण्यात आले आहेत. आरक्षित सीटपैकी लोअर सीट प्राधान्याने ज्येष्ठ महिला आणि गर्भवती महिलाांना देण्यात येणार आहे. आरक्षित सीटसोबतच महिलांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.